विज्ञान-गणिताच्या प्रतिकृतीतून विद्यार्थ्याचा नाविन्यपूर्ण अविष्कार! एसएनडी सीबीएसई शाळेत विज्ञान प्रदर्शनात ८८ विद्यार्थ्यांचा सहभाग

 विज्ञान-गणिताच्या प्रतिकृतीतून विद्यार्थ्याचा नाविन्यपूर्ण अविष्कार!

एसएनडी सीबीएसई शाळेत विज्ञान प्रदर्शनात ८८ विद्यार्थ्यांचा सहभाग 








येवला :

बाभूळगाव येथील एसएनडी सीबीएसई शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात आपल्यातील बौद्धिक कलेचा अविष्कार साधला. या उपक्रमामध्ये एकूण ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व ४८ मॉडेल सादर केले 

विद्यालयात सायन्स आणि मॅथेमॅटिक्स एक्झिबिशन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान आणि गणिताशी संबंधित संकल्पना सादर केल्या.उद्घाटन  मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज प्राचार्या व बाटू युनिव्हर्सिटीच्या व्हॉइस चान्सलर रसिका भालके,एसएनडी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे प्राचार्य निलेश शिंदे व एसएनडी सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या प्राची पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल्स आणि प्रकल्पांनी विज्ञानाच्या अद्भुत शक्यता आणि गणितातील सौंदर्य यांचा उत्तम संगम सादर केला.प्रदर्शनात सौर ऊर्जा, जलसंवर्धन, रसायन प्रयोग, गणितीय पद्धती,आणि 3डी मॉडेल्स यांसारख्या अनेक आकर्षक प्रकल्पांचे प्रदर्शन झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढीस लागेल तसेच त्यांचे सर्जनशील विचार विकसित होण्यास मदत होणार आहे.

यावेळी भालके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, “या प्रदर्शनामुळे मुलांच्या शैक्षणिक क्षमतेसोबतच त्यांची तांत्रिक आणि सर्जनशील दृष्टी विकसित होईल. अशा उपक्रमांमुळे ज्ञानप्राप्तीला नवा आयाम मिळतो. असे स्पष्ट केले.शाळेच्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीला दाद दिली. 



प्रदर्शनात पहिली ते चौथीच्या गटात तैब पठाण (ऍसिड रेन) याने प्रथम क्रमांक मिळवला.पाचवी ते सातवीच्या गटात आदिती गायकवाड,आरोही घुसळे,रीचा प्रसाद (मॅथ पार्क) यांनी तर आठवी ते दहावीच्या गटात प्रेम गायकवाड,अनिकेत घुले,प्रसाद भड (वॉटर आलाराम) यांनी प्रथम कमांक मिळवला.प्रतीक आहेर,अश्विनी वर्पे,करिष्मा पठाण,संगीता धारणकर,संदीप दानेकर,श्रीकांत सूर्यवंशी, दत्तू उगले,धनश्री ठाकूर,सोनाली संसारेकोमल पेंढारे,आदिती कटाळे,पुनम नंदाळे,शालिनी रक्ताटे, प्रणाली काळे,भारती साप्ते,प्रतिभा मस्के,स्वाती पांगुळ,सोनल ढगे आदींनी संयोजन केले.

फोटो 

बाभूळगाव : येथील एसएनडी सीबीएसई शाळेच्या विज्ञान प्रदर्शनातील प्रतीकृती पाहणी करतांना पदाधिकारी.

थोडे नवीन जरा जुने