टॅलेंट सर्च परीक्षेतून दहावीच्या हजारावर विद्यार्थ्यांची जेईई,नीटची तयारी
संतोष ज्यू. महाविद्यालयात
सृष्टी क्षीरसागर,निशांत कुमावत,शुभम गुंजाळची बाजी!
येवला : न्यूजप्रेस वृत्तसेवा
कोटा,लातूर पॅटर्नच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेईई व नीट यासह इतर परीक्षांची तयारी व्हावी,त्याचे स्वरूप कळावे यासाठी बाभुळगाव येथील संतोष विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली.तालुक्यातील विविध विद्यालयातील इयत्ता दहावीचे सुमारे हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते.सृष्टी क्षीरसागर,निशांत कुमावत,शुभम गुंजाळ या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
दहावीनंतर अकरावी,बारावी सायन्स सोबतच जेईई,नीटची तयारी विद्यार्थी करतात. त्यानुषंगाने त्यांना अभ्यासक्रम व त्याचे स्वरूप कळावे यासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.यातील गुणवंत विद्यार्थ्यांना क्लासेस मध्ये सवलतही दिली जाणार आहे.सदर परीक्षेत तालुक्यातून ४२ माध्यमिक शाळेचे व ६ इंग्लिश माध्यम शाळेचे इयत्ता दहावीचे १०२२ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.सदर परीक्षा ५० प्रश्न व २०० गुणांची घेण्यात आली.सदर परीक्षेत प्रथम पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कामध्ये अनुक्रमे पाच ते पंचवीस टक्के सवलत देण्यात येणार आहे.
या परीक्षेत प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल उंदीरवाडी शाळेची विद्यार्थिनी सृष्टी क्षीरसागर हिने मिळविला.द्वितीय क्रमांक डी पॉल शाळेचा निशांत कुमावत,तृतीय क्रमांक आदर्श माध्यमिक विद्यालय चिचोंडी येथील शुभम गुंजाळ,चतुर्थ क्रमांक जनता विद्यालय मांडवड (ता.नांदगाव) येथील सौरभ पवार व पाचवा क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल येथील सुदर्शन पैठणकर यानी मिळवला.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
बदलत्या काळानुसार इयत्ता दहावीनंतर असलेल्या शैक्षणिक वाटा आहेत तसेच डॉक्टर व इंजिनियर होण्यासाठी नीट,जेईई, एमएचटी-सीईटी,एनडीए या सारख्या परीक्षेचे स्वरूप त्याची व्याप्ती या संदर्भात विविध कोचिंग क्लासेसचे तज्ञ मार्गदर्शक वैभव संधान,नितीन कदम,पंकज जैन यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष शिक्षक आमदार किशोर दराडे,संचालक लक्ष्मण दराडे,कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य जी.एस.येवले,विभाग प्रमुख किरण पैठणकर तसेच मनोज खैरे,योगेश्वर देवकर,
आप्पासाहेब कदम,दत्तात्रय खोकले,विठ्ठल परदेशी,प्रदीप पाटील,रावसाहेब मोहन,किरण गायकवाड, नवनाथ जाधव,राहुल गोलाईत, भाऊसाहेब अनर्थे,अरुण जाधव,लक्ष्मण देवडे,लखन बाकळे,समाधान जाधव,विलास पिंगट,अजित देठे,कैलास गायकवाड,संतोष आव्हाड आदींनी नियोजन केले.
"बाभूळगाव येथील एसएनडी शैक्षणिक संकुल या ठिकाणी कोटा व लातूर पॅटर्न या धर्तीवर नामांकित कोचिंग क्लासेसची सुरुवात करत आहोत.नीट,जेईईच्या तयारीसाठी आम्ही हा उपक्रम राबविला.या क्लासेसमुळे विद्यार्थ्यांना येवल्यासारख्या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे."
-जी.एस.येवले,प्राचार्य,एस.एस.एम.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,बाभूळगाव
फोटो
बाभूळगाव : संतोष ज्यू.महाविद्यालयात टॅलेंट सर्च परीक्षेत सहभागी दहावीचे विद्यार्थी.
बाभूळगाव : संतोष ज्यू.महाविद्यालयात टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंताचा गौरव करतांना प्राचार्य जी.एस.येवले आदी.