नगरसुल येथे आप-आपसात समझोता करून 2 शेत रस्ते खुले झाले

 


नगरसुल येथे आप-आपसात समझोता करून 2 शेत रस्ते खुले झाले

 

येवला : न्यूजप्रेस वृत्तसंस्था


 जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या आदेशाने गाव नकाशाप्रमाणे येवला तालुक्यातील मौजे नगरसुल येथील शेतरस्ते मोकळे झाले आहे.




अतिक्रमित रस्ते, शेत रस्ते, शिवरस्ते, शेतावर जाण्याचा मार्ग मोकळा करण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू असून येवल्यातील नगरसुल येथील गट नं 863 मधील रस्त्याचा वाद तसेच गट  नं 670 मधील बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते.



मा.जिल्हाधिकारी,नाशिक यांचेकडील परिपत्रक अन्वये तहसीलदार आबा महाजन यांचे मार्गदर्शनाने बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी सदर रस्त्याचे वाद मिटविण्यात आले असून वादी व प्रतिवादी यांनी भविष्यात या रस्त्याबाबत कुठलाही वाद उपस्थित करणार नाही व अडवणूक करणार नाही याबाबत पंचनामा व जबाब नोंदवला. याप्रसंगी नगरसुल येथील मंडळ अधिकारी श्री.नारायण बाबासाहेब गायके, ग्राम महसूल अधिकारी नगरसुल बापू  पवार ,ग्राम महसूल अधिकारी वाईबोथी संकेत मरवट , विवेक गाडेकर महसुल सेवक व पोलीस पाटील ,सुनिल कदम ,किरण कोतकर पोलिस पाटिल व गावातील नागरिक उपस्थित होते.





-------

"शेत रस्ताचे वाद मिटवण्यासाठी  संबधित गावांचे तलाठी, मंडल अधिकारी यांना बैठक घेऊन सविस्तर सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने बऱ्याच वर्षांपासून वादात अडकलेल्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणारे न्यायालीयन वाद देखील संपुष्टात येतील.एका आठवड्यात चार शेत रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.




- आबा महाजन, तहसीलदार, येवला

थोडे नवीन जरा जुने