जीवन सुखावह करण्यासाठी विज्ञानाचे नवनवीन शोध -
संजय कुसाळकर : एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
लघु विद्युत जनित्रला प्रथम क्रमांक
येवला : पुढारी वृत्तसेवा
विद्यर्थ्यामध्ये वैज्ञानिक
दृष्टिकोन वाढीस वाढीस लागला, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे येवला तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात एकसे बढकर एक असे तब्बल ७५ उपकरणे सादर करण्यात आली होती.
या प्रदर्शनात शालेय विद्यार्यानी दैनंदिन जीवनात उपयुक्त पडणारी अनेक उपकरणे सादर करण्यात आली होती. या विज्ञान प्रदर्शन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून अटल टिनकरिंग लॅब चे जिल्हा समनव्यक संदीप आढाव, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक दिगंबर बाकळे, प्राचार्य लक्ष्मण बरहाते, पर्यवेक्षक राधिका बावके व पालक उपस्थित होते.
यावेळी सूक्ष्म जीवांचा खटला, मनाला पटला ही लघु नाटिका श्रद्धा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केली. विज्ञान चळवळ ही काळाची गरज असून, जीवन सुखावह करण्यासाठी, दैनंदिन जीवनात कमी श्रमात अधिक लाभ प्राप्त करण्यासाठी
विज्ञानच आपल्याला बळ देऊ शकते, असे प्रतिपादन यावेळी गटशिक्षणाधिकारी कुसाळकर यांनी केले.
यावेळी यांनी विज्ञानाची
कास धरत असताना, पर्यावरणाचा समतोल
साधण्यासाठी कृती करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
विज्ञानाचा शोध हा मानवासाठी
उपकारक असावा, अपकारक नको, असेही कुसाळकर यांनी सांगितले.
विज्ञान शिक्षक दिनेश धात्रक, मंजुषा भोर यांच्या कौशल्यने
प्रयोग मांडणी शिल्पा सूर्यवंशी, श्रद्धा कुलकर्णी, सौरभ निखाडे यांच्या सहकार्याने करण्यात आली.
परीक्षक म्हणून संजय वाबळे, दिनेश धात्रक, श्रद्धा कुलकर्णी, शिल्पा सूर्यवंशी, यांनी काम पाहिले.
या प्रदर्शनाचे उदघाटन समारंभाचे अध्यक्षत स्थानी संचालक दिगंबर बाकळे, तर प्रदर्शन पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षत स्थान संचालक सुनील मेहेत्रे होते. सूत्रसंचालन माधुरी सूर्यवंशी, विठ्ठल पैठणकर, मंजुषा भोर, सौरभ निखाडे यांनी केले. यासाठी कैलास लोणारे, संजय मढवई, प्रिया वाघ, राहुल आढांगळे, वंदना वरंदळ, सविता बोरसे, अनिल गावकर, प्रतीक हिवाळे, निरंजन बारहाते, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रदर्शनात सादर उपकरणे -
शेतीचे संरक्षण, नैसर्गिक शेती, चांद्रयान-3, धगधगता ज्वालामुखी, पॉवरफुल कुट्टी मशीन, मनी बँक, उपयोगी शेती, शेती संरक्षण, हवेचे परिणाम, झाडांची वाढ, रेनवॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प, हवेतील प्रकाश, वजन उचलण्याचे यंत्र, जलरोधक वस्त्र करणारे यंत्र, रोड लिफ्ट, जलविद्युत निर्मिती, सेंद्रिय शेती, व्हिलेज सिक्युरिटी, वायू प्रदूषण, इलेक्ट्रीसिटी, लेजर लाईट होम सेक्युरिटी, ग्रास कटर, भूकंप व्यवस्थापन, वाहतूक दळणवळण, टाकाऊपासून टिकाऊ, इलेक्ट्रीक प्रोजेक्ट, चांद्रयान -4, आधुनिक शेती (व्यवसाय), कचरा व्यवस्थापन, विद्युतनिर्मिती, आधुनिक रोड, रेनवॉटर हार्वेस्टिंग, फ्री एनर्जी, सौर ट्रॅक्टर, विजधक्का रक्षक, जीवन रक्षक यंत्र, वॉटर सेविंग अलार्म, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आणि दळणवळण, ज्वालामुखी, भूकंप संदेश ध्वनियंत्र, संगणकीय विचार, गणितीय मोडेल, स्प्रेअर रोबोट, वायरलेस चार्जिंग कार, अम्बुलंस मेनेजमेंट, वाटर सर्कुलेशन, टाकाऊ वस्तूपासून वीजनिर्मिती, अग्नी सूचक यंत्र, पाणी शुद्धीकरण, जीओमेट्रीक पार्क, इलेक्ट्रीक जनरेटर, न्युक्लिअर पॉवर प्लांट, घर आणि शेती सरंक्षण,
फोटो -
पारितोषिक स्वीकारताना बाल वैज्ञानिक