मातोश्री अभियांत्रिकीने भरले आमच्या पंखात बळ!

 मातोश्री अभियांत्रिकीने भरले आमच्या पंखात बळ!

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न,जुन्या आठवणींना दिला उजाळा



येवला,ता.३० : एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याने जुन्या आठवणींना नवा उजाळा दिला. परिसर बदलला असला तरी या महाविद्यालयाशी व भिंतीशी आपली नाळ आजही जोडलेली असल्याची भाव प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. बऱ्याच काळानंतर सर्वांना एका हृद्य भेटीचा आनंद अनुभवायला मिळाला. हा मेळावा विद्यार्थ्यांच्या हृदयातील भावनिक नाळ पुन्हा एकदा जोडणारा एक संस्मरणीय क्षण ठरला.

प्रारंभी विद्यार्थी असोसिएशनचे प्रमुख प्रा.विकास दौंड यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी कायम जोडून ठेवण्यासाठी असोसिएशनच्या भूमिका स्पष्ट केल्या.महाविद्यालयाच्या प्रगतीची माहिती देताना प्रा. निरंजन भाले आणि डॉ. श्रीधर खुळे यांनी गेल्या काही वर्षांत शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात संस्थेने केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला.त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाची बांधिलकी अधोरेखित केली.त्यांनी स्वायत्त माहविद्यालया बद्दल माहिती दिली.



माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे शब्दांमध्ये वर्णन करत,महाविद्यालयाने दिलेल्या शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अजय कदम, प्रतीक सोनवणे,अथर्व संगोरे, गणेश दवंगे,मेघा बोचरे,आकाश बडगुजर,विनय गाडगीळ, यश पाळ्दे आणि शुभम हेगडे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाचा गौरव केला. शुभम हेगडे यांनी भावूक होत म्हटले, मातोश्री हे फक्त महाविद्यालय नाही, तर आम्हाला घडवणारे दुसरे घर आहे. आम्ही महाविद्यालयासाठी कायमस्वरूपी उभे आहोत..या स्नेहमेळाव्यात बऱ्याच काळानंतर मित्रांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद अनुभवला.जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. विद्यार्थ्यांनी सांगितले की,महाविद्यालयाचा परिसर बदलला आहे, पण आपली नाळ आजही इथल्या भिंतींशी जोडलेली आहे.

ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ. निलेश घुगे यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वांगीण सहकार्याचे आवाहन केले.

मातोश्री शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कुणाल दराडे तसेच प्राचार्य गजानन खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला.

प्रा.किंजल जाणे यांनी सूत्रसंचालन केले.या मेळाव्यात माजी विद्यार्थी, विभागप्रमुख डॉ.जयंत चोपडे,डॉ.स्वाती भावसार डॉ.रणजीत गवांदे.डॉ.जयंत भांगळे, डॉ.ज्ञानेश्वर अहिरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माजी विद्यार्थी आपल्या मित्रांना आणि प्राध्यापकांना भेटून खूप आनंदित झाले.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि नवीन उर्जेचा संचार झाला.

फोटो

एकलहरे : मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याप्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी.

थोडे नवीन जरा जुने