"एकलव्य संघटना संस्थापक शिवाजी ढवळे यांचा ॲड माणिकराव शिंदे यांना पाठिंबा..!
येवला :
एकलव्य संघटना संस्थापक शिवाजी ढवळे यांनीं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार ॲड माणिकराव शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना शिवाजीराव ढवळे म्हणाले की गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रातील राजकारण अतिशय गलिच्छ झालेले आहे असे राजकारण यापूर्वी कधीही पाहायला भेटले नाही. आमदार फुटले गेले पक्ष फोडले गेले गोरगरिबांसाठी कोणतीही धोरणे राबवण्यात आली नाही, आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न महायुतीच्या राज्य सरकारकडून करण्यात आला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आदिवासींच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली. आदिवासींचे आरक्षण टिकवायचे असेल तर बदल घडला पाहिजे भाजप सह महायुती सरकारने कायम आदिवासी आरक्षण विरोधी भूमिका ठेवली याकरता सर्वसामान्य माणसांचे असलेले महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे याकरता आदिवासी समाजाने महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट माणिकराव शिंदे यांना मतदान करावे असेही आव्हान यावेळी शिवाजीराव ढवळे यांनी केले. आदिवासी समाजाचे आरक्षण टिकवायचे असेल तर एकलव्य संघटनेसह सर्व आदिवासी संघटनेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या पाठीशी उभे राहावे असेही आव्हान हे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केले.