जिल्हा परिषद शाळेच्या मुलांच्या गणवेशाची आतुरता संपली  तब्बल साडेतीन ते चार महिने उशिरा मिळाले गणवेश

जिल्हा परिषद शाळेच्या मुलांच्या गणवेशाची आतुरता संपली 

तब्बल साडेतीन ते चार महिने उशिरा मिळाले गणवेश

 शिंदे गटाच्या तालुका प्रमुख शेळके यांची मध्यस्थी ठरली यशस्वी.


येवला : पुढारी वृत्तसेवा
 तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना गणवेश वाटप सुरुवात झाली आहे.  पाटोदा केंद्रापासून गणवेश वाटपाला सुरुवात झाली आहे.तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेला मुलांना चार महिने उलटून गेले तरी शाळेचे गणवेश मिळाले नव्हते याबाबत येथील शिवसेना शिंदे गटाची तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके यांनी तातडीने दखल घेऊन तालुक्यातील पंचायत समिती येथील गट शिक्षण अधिकारी  कुसाळकर यांना घटनेची सर्व माहिती देऊन तात्काळ तालुक्यातील सर्व शाळांना मुलांना गणवेश वाटण्यात यावे यासंदर्भात भेट घेऊन चर्चा करण्यात आली.  त्याबाबत कुसळकर यांनी ज्या महिला बचत गटाला गणवेश बनवायला लावलेले होते त्यांना चार दिवसात संपूर्ण गणवेश शिवून तयार करायला लावले ,  सोमवार दि 7 रोजी तालुक्यातील पाटोदा केंद्रावरून तालुका प्रमुख पांडुरंग शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेतील शाळांना गणवेश वाटपाला सुरुवात झाली. गणवेश मिळाल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे असू दिसून आले. यावेळी शिवसेना सहसंघटक सुनील काळे भाजपा युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष मीनल पाटील उपाध्यक्ष विक्रम बोराडे ऋषिकेश दौंडे,मयूर पानसरे बाबासाहेब शिंदे रावसाहेब पारखे सागर गायकवाड या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 फोटो ओळी:- पाटोदा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गणवेश वाटप करताना शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील शेजारी मुख्याध्यापक  लोहकरे भाजपचे मीनल पाटील विक्रम बोराडे सुनील काळे आधी 

 प्रतिक्रिया.....
 तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांना गणवेश मिळणार आहे थोडा वेळ झाला अधिकचा वेळ होणार नाही.काही लोकांकडून गैरसमज पसरवल्या जात होते परंतु वरिष्ठ स्तरावर याबाबत माहिती देऊन पाठपुरावा केला आणि प्रशासनाच्या वतीने तातडीने पावले उचलले  .
 पांडुरंग शेळके शिवसेना तालुका प्रमुख येवला.
थोडे नवीन जरा जुने