येवल्याचे मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र पगार कृषि विभागाकडून सेवारत्न पुरस्काराने सन्मान!



येवल्याचे मंडळ कृषी अधिकारी हितेंद्र पगार कृषि विभागाकडून सेवारत्न पुरस्काराने सन्मान!


येवला : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दशकांपासून येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात नेहमी शेतकरी हिताचा विचार करून सक्रिय योगदान देणारे येथील मंडळ कृषि अधिकारी हितेंद्र पगारे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील सेवारत्न पुरस्कार मिळाला आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत संपन्न झाला.प्रशस्तीपत्र,स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कृषी विभागात काम करताना श्री.पगार यांनी येवला तालुक्यासाठी १० वर्ष द्राक्ष निर्यातीसाठी फायटो इन्स्पेक्टर म्हणून कार्य केले. डॉ.एम.एस. स्वमिनाथन रेडिओ किसान क्लब या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या किसान क्लबचे मुख्य प्रवर्तक राहिलेले आहेत.
कृषि विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात हागानदारी मुक्त झालेले पाहिले निर्मल ग्राम आडगाव रेपाळे यांच्या पुढाकारातून झाले असून मग्रारोहयो अंतर्गत शेतकऱ्याच्या शेतावर शतकोटी वृक्ष लागवडीसाठी साडेचार लाख वनरोपांची निर्मिती व परिसरात लागवड केली.यामुळे शासनाचा पर्यावरण संतुलनाचा पुरस्कार आडगाव रेपाळला मिळाला. 
पगार येथे फालोत्पादन अधिकारी असतांना शासकीय रोपवाटिकेस सलग २ वर्ष कृषि आयुक्तालंय स्तरावरून उत्कृष्ठ कार्यासाठीचा सन्मान झाला आहे.
लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी २ लाखांचे संगणक, बेंच व खेळाचे साहित्य त्यांनी मिळवून दिले.१५ कृषिविज्ञान मंडळ तथा शेतकरी गटांची स्थापना करून या माध्यमातून वृक्ष लागवड, ग्रामस्वच्छता, विक्रीगट, समुदाईक औजार बँक, शेतीशाळा हे कार्यक्रम राबवले.राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून ८ साखळी बंधाऱ्यांची निर्मिती,नाला खोलीकारण व रुंदीकरणातूनातून जलसंधारण तसेच फळबाग लागवडीस प्रोत्साहन दिले.शासकीय फालरोपवाटिका व बिजगुणन केंद्र सलग ८ वर्षे नफ्यात आणली आहे.
श्री. पगार राज्यस्तरावर कलमे रोपे दर निश्चिती समिती व रोपमळे अधिनियम दुरुस्ती समितीत सदस्य आहेत.शेतकरी संघटन करून आधुनिक शेतीला प्रोत्साहन,ठिबक सिंचन मोहीम स्वरूपात राबवून १०० हेक्टर क्षेत्रावर सिंचन
करणे,फालोत्पादनातून फलाहार स्वयंपूर्णतः अभियानातून शेतकऱ्याच्या अंगणात फलझाडांची लागवड प्रोत्साहन,आर्थिक दुर्बल घटकंसाठी गावठी कोंबडी कुकूट पालन प्रत्यक्षिके घेऊन शेतीपूरक व्यवसायास प्रोत्साहन,लागवड ते विक्री अभियान राबवून मका उत्पादक गटाकडून निर्यातदार सोबत विक्री करार असे अनेक शेतकरी हिताची कामे त्यांनी केली आहेत.त्यांच्या या कामाची दखल घेऊनच कृषि विभागाने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.
फोटो
मुंबई : कृषि विभागाचा सेवारत्न पुरस्कार राज्यपाल श्री राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वीकारताना कृषी अधिकारी हितेंद्र पगार व सौ.पगार.
थोडे नवीन जरा जुने