ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे कडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल





ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे कडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल



येवला : पुढारी वृत्तसेवा

 सामाजिक समीकरणांमुळे मी उमेदवारी पासून वंचित राहिलो असे स्पष्ट करत जरंगे पाटलांनी पाठिंबा दर्शविल्यास अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी जाहीर केले
. समर्थकांच्या आग्रहाखातर मेळावा घेण्यात आला, दराडे परिवाराने अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला.शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब जगताप अध्यक्षस्थानी होते.यावेळी ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे,काँग्रेसचे सचिन होळकर,ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे,तालुकाप्रमुख जगन आहेर,शिवा सुराशे, शहरप्रमुख संजय कासार,युवाचे जिल्हाप्रमुख सुयोग गायकवाड,तालुकाप्रमुख सुनीता शिंदे, नितीन काबरा,भाजपचे माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, एजाज शेख,सुधीर जाधव आदी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
मागील चार वर्षापासून मतदारसंघात  प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडविल्या किंबहुना दोन्ही आमदारांच्या माध्यमातून कोट्यावधीची विकासकामे देखील केली.यावेळी ओबीसी विरुद्ध ओबीसी असे समीकरण होऊन भुजबळांचा पराभव निश्चित झाला असता किंबहुना जागा वाटपाच्या घडामोडीतही सर्व प्रमुख नेते माझ्या नावासाठी शेवटचा मिनिटापर्यंत आग्रही होते. मात्र तिसरा उमेदवार होण्याची शक्यता असल्याने नाईलाजाने मला उमेदवारी पासून वंचित राहावे लागल्याचा खुलासा कुणाल दराडे यांनी केला. 
मतदारसंघात आजही मराठा व ओबीसी बांधव माझ्यासोबत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शविल्यास उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.दराडे परिवार कधीही पडण्यासाठी उमेदवारी करत नाही.त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊ मात्र जनतेची सेवा अव्याहतपणे करत राहू असे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.यावेळी अनेक समर्थकांनी मनोगत व्यक्त करत उमेदवारी करण्याचा आग्रह धरला.
दरम्यान,कुणाल दराडे यांनी माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,सचिन होळकर,भास्कर कोंढरे, मकरंद तक्ते यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
थोडे नवीन जरा जुने