अॅड.माणिकराव शिंदे यांचा महाविकास आघाडीतर्फे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल...
येवला : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार एडवोकेट माणिकराव माधवराव शिंदे यांनी हजारो समर्थक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दाखल केला. सकाळी 12 वाजेपासून येवले शहरातून रॅलीला सुरुवात झाली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले , अहिल्याबाई होळकर , हिंदू सूर्य महाराणा प्रताप , तात्या टोपे , यांना पुष्पहार चढवून सैय्यद बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातून निघालेल्या या रॅलीचे विविध भागांमध्ये नागरिकांनी उत्साहामध्ये स्वागत केले. येवला शहर व तालुक्यासह निफाड तालुक्यातील 46 गावांमधील कार्यकर्ते व मतदारांची उपस्थिती ही लक्षणीय होती. शहरातून निघालेल्या या रॅलीचे समारोप हा एन्जोकेम विद्यालय येथे सभेमध्ये रूपांतरित होऊन झाला.
यावेळी अनेक मान्यवरांनी या वेळेस आपले मनोगत व्यक्त केले तर अनेक कार्यकर्त्यांनी घनाघाती भाषणांनी सभा गाजवली. यावेळी रॅलीमध्ये माणिकराव शिंदे यांच्यासोबत तालुकाध्यक्ष विठ्ठल शेलार , शहराध्यक्ष योगेश सोनवणे , विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम , शिवसेना नेते संभाजी पवार , माजी आमदार मारोतराव पवार , शिवा सुरासे , रतन बोरणारे , झुंजारराव देशमुख , गोरख आबा पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष संगीता पाटील , सानिया होळकर , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर देशमुख , शहराध्यक्ष मंगलसिंग परदेशी , अकबर शहा , अजिज शेख , निसार शेख , आलमगिर शेख , रिजवान भाई , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे उपस्थित होते. तसेच सभेच्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे तथा दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे हे देखील उपस्थित होते.