सर्वांनीच गांधीजींचे विचार अंगिकारण्याची गरज- गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर

सर्वांनीच गांधीजींचे विचार अंगिकारण्याची गरज- गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर

येवला  : पुढारी वृत्तसेवा  
 म.गांधी नेहमी सत्य वागायचे, आजच्या काळात गांधीजींसारखे सत्य वागण्याची गरज आहे, आणि सर्वांनीच गांधीजींचे विचार अंगिकारण्याची गरज आहे असे प्रतिपादन येवल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी केले. येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात आज म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
      कार्यक्रमाची सुरुवात मा. संजय कुसाळकर, विद्यालयाचे प्राचार्य दत्तकुमार उटवाळे, उपप्राचार्य सुरेश जोरी, पर्यवेक्षक अनिल शेलार, उच्च माध्यमिक प्रमुख कैलास पाटील, कैलास धनवटे, वीणा पराते, प्रसेन पटेल, निलेश निकम, सतीश विसपुते यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली.
विद्यार्थ्यांपैकी संस्कृती पवार, वैष्णवी काळे, पूजा गाडेकर, स्नेहल सजन, दिव्या औटी यांनी मनोगत व्यक्त करताना गांधीजींचे जीवनकार्य व स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य दत्तकुमार उटवाळे यांनी मनोगतातून लालबहादूर शास्त्री यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीचा परिचय करून दिला.
ज्येष्ठ शिक्षक बापू कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून गांधीजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान स्पष्ट केले.
        कार्यक्रमाचे नियोजन
व  सूत्रसंचालन आसावरी जोशी यांनी केले तर आभार प्रेरणा जोशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य सुरेश जोरी, पर्यवेक्षक अनिल शेलार, उच्च माध्यमिक प्रमुख कैलास पाटील, ज्येष्ठ शिक्षक बापू कुलकर्णी, कैलास चौधरी, कैलास धनवटे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने