विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन


विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन


येवला - पुढारी वृत्तसेवा

 विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शहरातून आज सघोष,  सदंड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन केले. 
 प्रांत सहकार्यवाह समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रांत डॉक्टर गजानन गणपत होडे, प्रमुख वक्ते तर डॉक्टर स्वप्नील शहा प्रमुख पाहुणे लाभले. तसेच यावेळी शस्त्रपूजन करण्यात आले.
दि.१२ ऑक्टोबर शनिवारी येवला शहरातील टिळक मैदानापासून संचलनाला सुरुवात झाली. 
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निघालेले संचलन शहरातील राणाप्रताप चौक, काळा मारुतीरोड, सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे गंगा दरवाजा, तसेच शहराच्या प्रमुख मार्गावरून
 संचलनाचा समारोप मुरलीधर मंदिर मंगल कार्यालय टिळक मैदान येथे करण्यात आला.
संचलनाच्या अग्रभागी भगवा ध्वज हाती घेऊन युवक  शुभ्र  अश्वारूढ झाला होता. त्यापाठोपाठ घोषपथक व सशस्त्र स्वयंसेवक शिस्तीने मार्गक्रमण करीत होते. यावेळी तालुक्याचे संघचालक मुकुंदराव गंगापूरकर आदींसह असंख्य स्वयंसेवक सहभागी झाले होते.
थोडे नवीन जरा जुने