विकासाची कामे करतांना आपण कधीही धर्म आणि जात पाहिली नाही - मंत्री छगन भुजबळ




विकासाची कामे करतांना आपण कधीही धर्म आणि जात पाहिली नाही - मंत्री छगन भुजबळ


येवला : पुढारी वृत्तसेवा

 येवला विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहे. ही विकासकामे करतांना कुठल्याही समाजावर अन्याय आपण होऊ दिला नाही. तसेच विकासाच्या या कामांमध्ये मी अधिक बोलण्यापेक्षा माझे कामे अधिक बोलतात असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते निमगाव वाकडा व पाटोदा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विश्वासराव आहेर, रतन बोरनारे, मोहन शेलार, साहेबराव आहेर, यांच्यासह प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे,नायब तहसीलदार पंकज मगर, गटविकास अधिकारी महेश पाटील, उपअभियंता श्री.कुलकर्णी, उपअभियंता श्री.पंकज घोडे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला नाशिक रस्ता काँक्रीटीकरण ५६० कोटी, लासलगाव विंचूर खेडलेझुंगे रस्त्यासाठी १३४ कोटी, लोनगंगा शिवनदीचे सुशोभिकरण करण्यासाठी प्रत्येकी १३ कोटी ५० लाख, येवला शिवसृष्टी पहिला टप्पा ११ कोटी, मुक्तिभुमी ३० कोटी,लासलगाव उपजिल्हा रुग्णालय १३.५० कोटी यासह कोट्यावधी रुपयांची कामे मतदारसंघात करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, विकासाला कुठलीही जात धर्म आणि पक्ष नसतो. विकासाची ही कामे कुठल्याही जातीचा विचार करून नाही तर सर्व समाजासाठी आपण काम केली आहे. विकासाच्या या कामांबाबत आपल्याला अधिक बोलण्याचे काम नाही. विरोधक मात्र टीका करण्याचे काम करतात. मात्र या मतदारसंघात आपली विकास कामेच सर्व बोलतात आपल्याला बोलण्याचे कामच नाही अशी टीका त्यांनी केली.


ते म्हणाले की, गेली सतरा वर्ष विशेष प्रयत्न करून मांजरपाडा प्रकल्प पूर्ण केला आहे. गुजरातकडे वाहून जाणारे पाणी बोगदयाद्वारे वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून वळवून आपण ते डोंगरगावपर्यंत आणले आहे. यापुढील काळात अधिक बंधारे वाढवून अधिक पाणी येवल्यात कसे आणता येईल यासाठी लवकरच बैठक घेऊन काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी येवला मतदारसंघातील ९३ हजार महिलांना लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, पालखेड डावा कालव्याच्या माध्यमातून पाटोदा परिसरातील सर्व बंधारे भरून देण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच हे बंधारे भरले जाऊन पाण्यावाचून कुणीही वंचित राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केली.



मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला मतदारसंघात आदिवासी बांधवांसाठी विशेष रेशनकार्ड शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिराअंतर्गत अर्ज केलेल्या आदिवासी बांधवांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.

फोटो

मांजरपाड्याचे पाणी कातरणी कानडी विसापूर विखरणी  आल्याने  येथील शेतकऱ्यांनी मंत्री भुजबळ यांचे गाड्या विखरणी येथे थांबवून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला  
थोडे नवीन जरा जुने