येवल्यात सर्वत्र पोळा उत्साहात


येवल्यात सर्वत्र पोळा उत्साहात

येवला :  पुढारी वृत्तसेवा

  शहर व ग्रामीण भागात पोळा सन उत्स्फूर्तपणे साजरा झाला. शेती प्रश्नावरील विविध समस्या व विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत आपल्या बैलांवर अनोखे संदेश शेतकरी राजाने रेखाटले.शहरात पोळ्यानिमित्त शिंदे परिवाराच्यामानाच्या  बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 
सोमवारी पहाटेपासूनच पाऊस  दिवसभर  होता मात्र चार वाजेनंतर पावसाचा जोर थोडाफार ओसरल्याने शेतकऱ्यांनी जोरदार तयारी करत पोळा सण जल्लोषात साजरा केला.शहरात पोळ्यानिमित्त शिंदे परिवाराची मनाची परंपरा असून गंगादरवाजा भागात ढोल ताशांच्या तालावर बैलांची भव्य मिरवणूक काढली.मानाच्या बैलांची आकर्षक सजावट केली होती.शहरातील बैलपोळ्याचा मान हा शिंदे कुटुंबीयांना असून, ढोल-ताशांच्या गजरात प्रगतशील शेतकरी भास्कर शिंदे यांच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन करून शिंदे कुटुंबीयाकडून शहरातील गंगादरवाजा भागात महादेव मंदिरासमोर शिंदे यांच्या बैलांचे पूजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ नेते माणिकराव शिंदे,भास्कर शिंदे, अरविंद शिंदे,आबासाहेब शिंदे आदी शेतकऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शहरात ठीकठिकाणी या बैलजोडीचे महिलांनी पूजन करून पुरणपोळीचा प्रसाद दिला.          .
याशिवाय मोरे वस्ती,सोनवणे वस्ती व शहरातील आजूबाजूच्या शेतकरी कुटुंबीयांनी देखील वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढत पूजा केली.
थोडे नवीन जरा जुने