एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या धरणे आंदोलनामुळे येवल्यात एसटीचा चक्काजाम
येवला : पुढारी वृत्तसेवा
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा परिणाम एसटी सेवेवर झाला आहे .
चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती मुख्य बस स्थानक असलेल्या येवला आगारात या आंदोलनाचा परिणाम जाणवत असून रात्री 12 नंतर एकही एसटी या आगारातून न निघाल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. येवला आगाराचे सर्व कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी असल्यामुळे येवल्यात एसटीचा चक्काजाम पाहायला मिळत आहे .
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा व आमच्या वरिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन द्यावे यानंतरच हे आंदोलन मागे घेतले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला