शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्याकडे गेला, अन निर्यात बंदी हटवली - जयंत पाटील
शेतमालाचे भाव वाढले की महागाई वाढते, असे केंद्रातील सरकारला वाटते - जयंत पाटील
येवला : पुढारी वृत्तसेवा
एका बाजूला कांद्यावरील निर्यात बंदी हटवायची अन दुसऱ्या बाजूने अफगाणिस्तानचा कांदा आयात करायचा हे कोणते धोरण? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली येवला मतदारसंघातून ५ ते ६ जण इच्छुक असून सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा अन एकदा पवार साहेबांनी उमेदवारी दिली की त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्लाही त्यांनी इच्छुकांना दिला मोटार सायकल रॅली काढून शिवस्वराज्य यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर माऊली लॉन्स या ठिकाणी आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार भास्करराव भगरे, माणिकराव शिंदे, माजी आमदार मारोतराव पवार,हेमंत टकले, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय अध्यक्ष पंडित कांबळे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, कार्याध्यक्ष दत्ताजी पाटील, नितीन भोसले, पुरुषोत्तम कडलग भगवान तावरे, भगवान भालेराव, गौरव भालेराव, महिला अध्यक्ष संगीता पाटील, विठ्ठल शेलार, तुषार जाधव, शालिग्राम माळकर, जयदत्त होळकर, महेंद्र पगारे, सोनिया होळकर,योगेश सोनवणे उपस्थित होते
या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न कांद्याचा आहे. आपला सगळा कांदा विकला गेला. शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्याच्या ताब्यात गेला, आणि केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली. निर्यातीवरचे कर काढले, फायदा शेतकऱ्यांचा नाही तर व्यापाऱ्यांचा होतोय. आपल्या देशात कांद्याच्या किमती वाढायला लागल्या. केंद्र सरकारने लगेच अफगाणिस्तान मधुन पंजाब पर्यंत कांदा आयात केला. या देशातल्या शेतकऱ्याला मारून या देशातली महागाई कमी करण्याचे पाप भारतीय जनता पक्ष करते आहे अशी टीका त्यांनी केली विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्याने होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सरकार विरोधी असंतोष तुम्ही दाखवून दिला आहे आता पुन्हा ती वेळ येत आहे असे ते म्हणाले
शेतीमालाचे दर हे आधारभूत किमती प्रमाणे वाढवत राहणं हे काम शरद पवारांनी केलं आहे.
सध्या आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. तुम्ही चंद्र मागितला तर तो ही आणून देतो, असे हे सांगतील. तुम्ही अंगावरचे कपडे मागितले तर अंगावरचे कपडे काढून द्यायला कमी करणार नाहीत. पण माझी लाडकी खुर्ची सोडणार नाही, असा उपरोधिक टोलाही पाटील यांनी लगावला.
लाडकी बहीण ही दोन महिन्यां पुरतीच आहे. पण खरा लाडका भाऊ तुमचा आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात बसलेला आहे. या विरोधी पक्षाची सत्ता आणली तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना आज जे तकलादु पणाने काही त्यांना देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने चालू आहे, त्यापेक्षा अधिक जास्त, अधिक चांगली व्यवस्था, आम्ही महाराष्ट्रात आमच्या भगिनींना देऊ, असेही पाटील म्हणाले. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. बदलापूरला जी घटना झाली, त्यात एक शिक्षण संस्था सहभागी आहे.आता हे सरकार जाणारच आहे. तर शेवटचा उपाय म्हणून जातीय दरी वाढवण्याचे काम चाललेलं आहे. धार्मिक दंगली व्हाव्यात, असा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. दुर्दैवाने अशी वक्तव्य सत्तारूढ पक्षाच्या आमदारांकडून केली जातात. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढच्या दोन महिन्यात शांत पणाने कोणत्याही अशा धार्मिक दंगली ला किंवा जातीय तेढीला प्रतिसाद देऊ नका. निवडणुकीसाठी ही लोक आता काहीही करतील. आपण संयम ठेवावा असे आवाहन त्यांनी केले
येवला विधानसभा मतदारसंघांत पाच-सहा जणांनी इच्छुक आहेत. मात्र आधी एकत्रित बसा, मला नाही मिळालं तर चालेल, पण मी मदत करायला तयार आहे, असे एकदा पाच जणांनी खोलीत बसून वचन द्या. सगळे मिळून एक संघ रहा. आपण पवार साहेब देतील तो आपला उमेदवार असं समजून काम करायचं आहे. असा सल्लाही पाटील यांनी दिला.यावेळी खासदार अमोल कोल्हे खासदार भास्कर भगरे,माजी आमदार मारोतराव पवार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर यांची भाषणे झाली यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष शाहू शिंदे , माजी नगरसेवक डॉ संकेत शिंदे , तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शेलार ,सुभाष निकम ,शहराध्यक्ष योगेश सोनवणे , महिला विधानसभा अध्यक्ष नलिनी शिंदे , उषाताई शिंदे , तालुका अध्यक्षा कालिंदीनी पाटील , शहराध्यक्ष कल्पना शिंदे ,नारायण मोरे ,अनिल मुथा, अशोक शहा , राजेंद्र हिरे ,सुरेश कदम ,प्रकाश होंडे , सुदाम सोनवणे , अरविंद शिंदे , अन्सार शेख , काका वाणी , पंकज सदगीर ,पंकज माळी ,संकेत सोनवणे ,सचिन कड , अकबर शहा , निसार नींबूवाले , रिझवान मेंबर , माजीद अन्सारी , सद्दाम शेख , वाल्मीक सोपे ,अमित शिंदे , राजेश कदम , शशांक पाटील , मोसिन शेख , फिरोज शेख , अनिल शिंदे , सुभाष गायकवाड , अजीज शेख , महेंद्र पगारे , दीपक लाठे , प्रदीप खैरनार , पिंटू आहेर , सचिन तांबडे , राकेश शिंदे , बबलू शिंदे , सुबोध शिंदे उपस्थित होते