संबळच्या तालावर शेतकऱ्यांसमवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी धरला ठेका

 माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते मांजरपाड्याच्या पाण्याने पुणेगाव दरसवाडी कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन



संबळच्या तालावर शेतकऱ्यांसमवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी धरला ठेका



*शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्यासाठी सर्वकाही - माजी खासदार समीर भुजबळ*




*कालवा अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर डोंगरगाव पर्यंत शेतकऱ्यांना मुबलक पाणी - माजी खासदार समीर भुजबळ*



*येवला,नाशिक,दि.१३ सप्टेंबर :-* राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या मांजरपाडा प्रकल्पातून पाणी डोंगरगाव पर्यंत पोहोचले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आपल्यासाठी सर्वकाही असून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण झाल्यानंतर डोंगरगाव पर्यंत सर्व शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.



पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड तालुक्यातील अनेक बंधारे भरण्यात आले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील कातरणी, विखरणी, गुजरखेडे, बाळापूर, अनकुटे या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.



यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला. या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. या कालव्याच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी पाणी डोंगरगाव साठवण तलावापर्यंत पोहोचले असून डोंगरगावसह विविध तलाव या पाण्याने भरण्यात आले आहे. त्यामुळे विशेष आनंद होत आहे. पुढील वर्षभरात अस्तरीकरणाचे काम तसेच गेटचे काम पूर्ण झाल्यानंतर येवला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होईल तसेच पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून भरण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रात वाढून शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल असे त्यांनी सांगितले.



यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते अंबादासजी बनकर, अरुण थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जलचींतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, 

येवला विधानसभा अध्यक्ष  वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी सभापती किसनकाका धनगे, एल.जी.कदम, संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष दत्ता निकम, नवनाथ काळे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, मच्छिंद्र थोरात, मकरंद सोनवणे, सरपंच सुनीता गायकवाड, बापू गायकवाड, नितीन गायकवाड, डॉ.प्रवीण बुल्हे, रावसाहेब आहेर, अरुण शिरसाठ,दिपक गायकवाड, भगवान ठोंबरे, श्रावण वाघमोडे, अंबादास पगार, रवींद्र शेलार, अशोक कोताडे, यमाजी शेलार, छबू शेलार, समाधान वाघमोडे, कौतिक शिरसाठ, परसराम शिरसाठ, सोपान शिरसाठ, देविदास पिंगट, गजानन घुमरे, सुभाष शेलार, दिलीप चव्हाण, संजय कोळगे, पुंजाराम गोरे, वसंत गोरे, दौलत गोरे, भाऊसाहेब उगले, बाबासाहेब गायकवाड, वामन गायकवाड, गोटू मांजरे, भूषण लाघवे, संतोष खैरनार, सचिन सोनवणे, नितीन आहेर, सुमित थोरात, प्रीतम शहारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



संबळच्या तालावर शेतकऱ्यांसमवेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी धरला ठेका



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते येवला तालुक्यातील कातरणी, विखरणी, गुजरखेडे, बाळापूर, अनकुटे या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणी शेतकरी वर्गाने समीर भुजबळ यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी जलपूजन करून आनंद साजरा करताना संबळच्या तालावर शेतकऱ्यांनी ठेका धरला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनीही शेतकऱ्यासोबत सहभागी होत ठेका धरला.

थोडे नवीन जरा जुने