येवल्यात एक हजारावर युवकांना मिळाली नोकरी! येवल्यात कुणाल दराडे फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्यात मिळाली नोकरी

 

येवल्यात एक हजारावर युवकांना मिळाली नोकरी!
येवल्यात कुणाल दराडे फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्यात मिळाली नोकरी


येवला : पुढारी वृत्तसेवा

शिक्षणानंतर छोठी-मोठी का होईना नोकरी असावी.. हे युवकांचे अन पालकांचे स्वप्न असते..याच हेतूने कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने येथे तरुणांसाठी नोकरी अन व्यवसायाची संधी उपलब्ध करून देत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.या निमित्ताने हजारावर युवकांना विविध कंपन्यांनी नोकरीची संधी दिल्याने या युवकांची नोकरीची स्वप्नपूर्ती झाली आहे.
धानोरा येथे कुणाल दराडे फाऊंडेशन,मातोश्री इंजीनियरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या पुढाकाराने रोजगार व स्वयरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.तीन हजारावर तरुणांनी यात सहभाग नोंदविला.उद्घाटनप्रसंगी कृषीतज्ञ सचिन होळकर,उद्योजक अरुण भावसार, युवा नेते कुणाल दराडे,प्राचार्य गितेश गुजराथी सर्व कंपनीचे प्रतिनिधी तसेच महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी आपली मेहनत व गुणवत्तेच्या आधारे कंपनीमध्ये नावलौकिकता कमावत असून महाविद्यालयात त्यांना मुलाखत तंत्राची माहिती देऊन सराव करून घेतला जातो तसेच वेळोवेळी सविस्तर मार्गदर्शन केले जाते.त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या जगदंबा व मातोश्री संस्थेच्या विविध महाविद्यालयात कॅम्पस मुलाखत घेण्याकरिता प्राधान्य देतात.दरवर्षी पाचशेवर विद्यार्थी शेवटच्या सत्रातील परीक्षा पूर्ण होण्याअगोदरच कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर ऑफर्स मिळालेले आहेत.
अजूनही अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची गरज असल्याने विशेष नोकरी मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात ३० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत युवकांना नोकरीची संधी मिळवून दिली.नाशिक येथील महिंद्रा व महिंद्रा,मायको बॉसच,किर्लोस्कर लिमिटेड,पार्ष इन्फोटेक,रिंग प्लस ऑकवा,कलप्तरू कन्स्ट्रक्शन,जेबीएम प्रायव्हेट लिमिटेड तर पुणे येथील हायर अपलायंसेस,एझाकी इंडिया, बजाज ऑटो,टाटा मोटर्स, एन्झाईन बायो,शालिनी लॅब मुंबई येथील जनरल डायग्नोस्टिक आदी कंपनी उपस्थित होते. स्वयंरोजगार मार्गदर्शन करिता उद्योजकता विनभागाचे आलोक मिश्रा,अण्णासाहेब पाटील महामंडळ,महात्मा फुले महामंडळ,अण्णाभाउ साठे महामंडळ,महाराष्ट्र ओबीसी महामंडळ,इतर मागास वर्ग वित्त आणि महामंडळ, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,मुख्यमंत्री कौशल्य युवा प्रशिक्षण केंद्राच्या प्रतिनिधीनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी तरुणांना कुणाल दराडे,सचिन होळकर,आलोक मिश्रा,मायको बॉसच कंपनीचे अनंत दांडेकर,महामंडळाचे प्रतिनिधी अविनाश गायकर,महिंद्रा अँड महिंद्राचे किशोर गांगुर्डे आदींनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन गुणवत्तेच्या आधारे एक हजाराहून अधिक युवकांना नोकरी मिळाली आहे.१२ वी व आयटीआयच्या विद्यार्थ्यांना १६ हजार,
डिप्लोमा,बिए,बीएससी,बी कॉम धारक तरुणांना १८ हजार तर इंजीनियरिंग डिग्री विद्यार्थ्यांना २२ ते २५ हजारहून अधिक महिना पगाराची नोकरी विविध कंपन्यांनी दिली असून कॅन्टीन,बस,इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट सुविधा कंपनी मार्फत मोफत देण्यात येणार आहे. ही संधी मिळाल्याने अनेक तरुणांनी यावेळी कुणाल दराडे यांचे विशेष आभार व्यक्त केले.मातोश्री पॉलिटेक्निक व इंजीनियरिंगचे प्राचार्य गीतेश गुजराथी,ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख नितीन गुजर सर्व विभागप्रमुख आदींनी नियोजन केले.

"नामांकित कंपन्यात तरुणांना नोकरी उपलब्ध आहे,मात्र त्यासाठी संधी मिळायला हवी यासाठी आम्ही वर्षभर अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन,फार्मसी महाविद्यालयात कंपन्यांना बोलावून कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करतो. याशिवाय वंचित विद्यार्थ्यांनाही नोकरीची संधी मिळावी यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची निवड झाली असून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर नोकरी मिळून देत असल्याचे वेगळे समाधान आमच्या संस्थेला आहे."
- कुणाल दराडे,सचिव,मातोश्री शिक्षण संस्था

फोटो
धानोरे : रोजगार मेळाव्या प्रसंगी तरुणांसोबत कुणाल दराडे व कंपनीचे अधिकारी
थोडे नवीन जरा जुने