येवला विधानसभा मतदारसंघात दोन दिवस होणार मतदार नोंदणीची विशेष मोहीम पुनरीक्षण कार्यक्रम : शनिवार आणि रविवारी केंद्रावर बीएलओ
जास्तीत जास्त मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने येत्या शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक सुटीच्या दिवशी 119-येवला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविली जाणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपल्या नावाची खात्री करावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 119-येवला विधानसभा मतदार संघातंर्गत दि. 10 ऑगस्ट 2024 (शनिवार), दि. 11 ऑगस्ट 2024 (रविवार) व दि. १७ ऑगस्ट २०२४ (शनिवार) आणि दि. १८ ऑगस्ट, २०२४ (रविवार) रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मतदार संघातील नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून यादीत आपल्या नावाची खात्री करावी तसेच हरकत असल्यास दुरुस्तीबाबत आवश्यक कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.
दि. 10 ऑगस्ट 2024 (शनिवार), दि. 11 ऑगस्ट 2024 (रविवार) व दि. १७ ऑगस्ट २०२४ (शनिवार) आणि दि. १८ ऑगस्ट, २०२४ (रविवार) या दोन्ही दिवशी 119-येवला विधानसभा मतदार संघाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या दोनही दिवशी शिबिरांचा लाभ घ्यावा व नवीन मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, तसेच नागरिकांनी आपले नाव, छायाचित्र, पत्ता दुरुस्ती, मयत नागरिकांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादी शुद्धीकरण करण्यास मदत करावी असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा आबा महाजन व मतदार नोंदणी अधिकारी तथा बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.