राष्ट्रीय क्रीडा दिन बातमी



स्वामी मुक्तानंद महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिन उत्साहात साजरा

येवला : पुढारी वृत्तसेवा

 

श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचेस्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालययेवला जिल्हा नाशिक. शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे वतीने  " राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनानिमित्त " दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयात आयुष मंत्रालय भारत सरकार व फिट इंडिया अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. अनिल कुमावत यांनी सर्वांचे स्वागत करून या कार्यक्रमाची प्रस्तावना व महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदान याविषयी माहिती विस्तृत करून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर पाचोरे  यांचे शुभहस्ते महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मेजर ध्यानचंद यांचा आदर्श घेऊन देशाप्रती स्वाभिमान व प्रेम जागृत ठेवून आजच्या पिढीने आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले. डॉ.अजय विभांडीक  यांनी मेजर ध्यानचंद यांचे विषयी हॉकी खेळातील त्यांची कारकीर्द तसेच त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे कथन करून एक जीवनपटच सादर केला व माहिती देऊन शारीरिक सुदृढतेचे महत्त्व विशद केले. डॉ.अजय त्रिभुवन यांनी सदर कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त खेळाडूंना विविध पारितोषिके,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये  कुमारी श्वेता शर्माकुमारी सुकन्या शिंदेकुमारी दिव्या गायकवाड ,गायत्री आदमाने,संकेत उशीरसंकेत सोनवणेप्रेम ईसामपल्ली व महाविद्यालयाचे इतर विद्यार्थी व खेळाडूचा समावेश होता. प्रा.पी एन.पाटीलरसायनशास्त्र विभाग प्रमुख यांनी सर्व उपस्थितांचे खेळातून खेळाडूंची अंगी विकसित होणारे विविध शारीरिक मानसिक बौद्धिक व सामाजिक गुणांची आपल्या जीवनात कशा पद्धतीने समन्वय साधून एक उत्तम नागरिक घडविता येऊ शकतो याविषयीचे विवेचन केले  महाविद्यालयाचे प्रा. नितीन बच्छाव यांनी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापकप्राध्यापकेतर बंधू-भगिनी तसेच श्री हर्षल गायकवाडश्री अरुण खैरनारश्री लक्ष्मण पोळश्री वाल्मिक मगर श्री निंबा निकुमे व महाविद्यालयाचे इतर विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. अनिल कुमावत यांनी केले. 

थोडे नवीन जरा जुने