कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ येवल्यातील डॉक्टरांकडून काळ्याफिती लावून कामकाज
येवला : पुढारी वृत्तसेवा
दिनांक 17 ऑगस्ट रोजी येवला तालुक्यातील सर्व हॉस्पिटल्स अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्टर असोशियन ने घेतला आहे .
कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ देशभरात पडसाद उमटत असून नाशिकच्या येवल्यात देखील येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनस असोसिएशनच्या वतीने दिनांक 16 ऑगस्ट रोजी काळ्याफिती लावून कामकाज करण्यात आले तसेच शासनाने संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी दिनांक 17 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला
याप्रसंगी येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असो चे सर्व सदस्य उपस्थित होते