वह्या दप्तर व शालेय शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करत येवला व्यापारी महासंघाचा चौथा वर्धापन दिन साजरा...
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला व्यापारी महासंघाने चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी राखत येवले शहरात असलेली एकमेव जिल्हा परिषद शाळा लक्कडकोट येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी प्रत्येकी 1 दप्तर, 6 वह्या, पट्टी, पेन्सिल , खोडरबर , शार्पनर या शालेय उपयोगी वस्तूंचे 36 विद्यार्थ्यांना 36 किट तयार करून वाटप करण्यात आले .कोरोना च्या भीषण संकटामध्ये सर्व शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत एकच संघटना शहरांमध्ये उभी केली व ते लावलेल्या रोपटे आज वटवृक्षांमध्ये रूपांतरित होत चालले आहे. आज व्यापारी महासंघाच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधत शहरात एकमेव जिल्हा परिषद च्या असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे कीटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी येवले शहरातील सुकन्या कुमारी प्रियंका मोहिते जिने यूपीएससी परीक्षा पास करत आयपीएस पदाला गवसनी घातली तिचा सन्मान व सत्कार तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवले होते....
या कार्यक्रमास भरत समदडीया,सुहास भांबारे, दिनेश मुंदडा,नितीन काबरा, सौ संगीता पटेल,सुबोध गायकवाड तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनिल मारवाडी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण जाधव सर यांनी शाळे संदर्भात असलेल्या समस्या उपस्थितांसमोर मांडल्या व शाळेसाठी मोठी वास्तू उभी राहावी अशी अपेक्षा सर्वांसमोर व्यक्त केली... तसेच विस्तार अधिकारी सुनील मारवाडी यांनी येवला व्यापारी महासंघाचे या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी अनिल खैरनार,रुपेश घोडके,रवींद्र पवार, अतुल काथवटे, वाल्मीक सोपे ,मोहीते सर तसेच मुख्याध्यापक किरण जाधव, श्रीमती जयश्री आगरे,सौ शालिनी जाधव हे शिक्षक वर्ग उपस्थित होते....
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे... कार्यकारी अध्यक्ष अविनाश कुक्कर,.उपाध्यक्ष रितेश बुब, खजिनदार प्रसाद खांबेकर यांनी परिश्रम घेतले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक विजय चंडालिया यांनी केले.