येवला बस स्थानकावरील सीसीटीव्ही बनलाय शोभेचे बाहुले ; स्टोरेज सिस्टम नसल्यामुळे चोरट्यांना फावले

येवला बस स्थानकावरील सीसीटीव्ही बनलाय शोभेचे बाहुले ; स्टोरेज सिस्टम नसल्यामुळे चोरट्यांना फावले 
येवला : पुढारी वृत्तसेवा
चार जिल्ह्यांच्या मध्यावर असलेल्या येवला शहरातील बस स्थानकामध्ये विविध जिल्हा व तालुक्यामधून एसटी बस यजा करत असतात हजारो प्रवाशांची वर्दळ या ठिकाणी असते. या ठिकाणी गर्दुले व भुरट्या चोरांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर पसरले असून सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा केवळ शोभेचे बाहुले आहे या ठिकाणी स्टोरेज सिस्टमच नसल्यामुळे एखादा गुन्हा घडला तरी त्याचे चित्रीकरण रेकॉर्ड होत नाही त्यामुळे चोरटे बिनधास्तपणे या ठिकाणी चोऱ्या करतात .
येवला शहरातील सामाजिक कार्यकर्ते व कुस्ती क्षेत्रातील दिग्गज पैलवान संजय कुक्कर यांच्या नातेवाईकाचे दिनांक 5 ऑगस्ट सोमवार रोजी चोरट्याने पाकीट मारले यामध्ये काही रोख रक्कम महत्त्वाचे कागदपत्र होते .
दरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी जेव्हा प्रसिद्ध पैलवान संजय कुकर व त्यांचे नातेवाईक बस स्थानक च्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्या ठिकाणी सीसीटीव्ही चे व्हिडिओ चित्रीकरण स्टोरेज सिस्टमच नसल्यामुळे झालेला प्रकार रेकॉर्ड होऊ शकला नाही .
त्यामुळे चोरी होऊन सुद्धा गुन्हा तरी दाखल करावा कसा हा प्रश्न कुक्कर कुटुंब यांना पडला आहे त्यामुळे आज जे दोष असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
थोडे नवीन जरा जुने