येवल्यात काँग्रेसचे टाळनाद आंदोलन

येवल्यात काँग्रेसचे टाळनाद आंदोलन
      

येवला : पुढारी वृत्तसेवा
        येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तहसील कार्यालय येवला येथे केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी भरीव अशी कोणती तरतूद केली नाही. तसेच कर्जमाफी बद्दलही निर्णय घेतला नाही. केंद्र व राज्य सरकारचे धोरण हे संपूर्णपणे शेतकऱ्यांविरुद्ध असून अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी बद्दलही कोणताही निर्णय घेतला नाही, मागील दोन-तीन वर्षात सातत्याने दुष्काळ पडल्यामुळे तसेच शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, देशामध्ये महागाई गगनाला भिडलेली आहे प्रत्येक वस्तू ही महाग झालेली आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील उद्योगधंदे सरकारच्या धोरणामुळे बंद पडले आहे त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे युवकांना रोजगार मिळावा, पेट्रोल डिझेलच्या दरवाढ कमी करावी घरगुती गॅसच्या किमती कमी कराव्या या मागणीसह शेतकऱ्यांची वीज बिलही माफ करावे या मागण्यांसाठी आज येवला तहसील कार्यालय येथे येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे धरणे धरून टाळनाद करून आंदोलन करण्यात आले.
        यावेळी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ झालेच पाहिजे, दुष्काळाचे अनुदान त्वरित मिळालेच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटलाच पाहिजे, महागाई कमी झालीच पाहिजे, युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे या मागण्या करत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ वाजून तसेच घोषणाबाजी करून तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.  टाळनाद करून शेतकऱ्यांच्या आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले. 
      यावेळी शेतकऱ्यांच्या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांनी स्वीकारले. 
                  यावेळी तालुकाध्यक्ष      अँड. समीर देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, माजी शहराध्यक्ष प्रीतम पटणी, कॉम्रेड भगवान चित्ते, माजी प्राचार्य दिनकर दाणे, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, तालुका कार्याध्यक्ष विलास नागरे, शिवनाथ खोकले, सुखदेव मढवई, भाऊराव दाभाडे, दत्तू भोरकडे, मारुती सोमासे, एन. एस. यु. आय. तालुकाध्यक्ष नाना शिंदे, आबासाहेब शिंदे, नितीन संसारे, दिलीप तक्ते, अँड. अमोल पगारे, बाबूलाल पडवळ, रोशन धिवर, भाऊसाहेब आवारे, भगवान दिवे, एकनाथ मढवई, दिलीप कचरे, जगन बोराडे, शकील शेख बाळकृष्ण पोटे कालिदास अनवडे, प्रवीण निकम, नितीन भोरकडे, अण्णासाहेब सोमासे, गोकुळ काळे, अण्णासाहेब कोकाटे, आप्पासाहेब काळे, महेंद्र खळे, माधव मुंढे, श्रीरंग आहेर, शिवाजी भोरकडे, शकुंतला साबळे यासह काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने