येवल्यातील विणकरांच्या कलाकुसरीमुळे येवल्याच्या वैभवात अधिक भर - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 


येवल्यातील विणकरांच्या कलाकुसरीमुळे येवल्याच्या वैभवात अधिक भर - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार




येवला : पुढारी वृत्तसेवा

रघुजीबाबा शिंदेनाईक सरदार यांनी येवल्याची स्थापना केली. त्या येवल्याची महाराष्ट्रातील बनारस अशी ओळख आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे येवल्याचा सर्वांगीण विकास झाल्याने येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला. आणि आज येवला जगभरात पोहचला आहे. त्यामुळे येवल्याच्या झालेला सर्वांगीण विकास कुणीही नाकारू शकत नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थित येवला माऊली लॉन्स येवला येथे विणकर मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, विणकर बांधवांनी येवल्याचे वैभव अधिक वाढवले आहे. त्याबद्दल त्याचा सन्मान करतो. आज येवल्याची पैठणी राजकीय लोकांनी देखील अधिक जवळ केली असून निवडणुकीतून काही लोकांनी पैठणी वाटप केल्याच्या चर्चा नाशिक जिल्ह्यात आहे. त्या पैठण्या खऱ्या की खोट्या याबद्दल सांगता येणार नाही अशी मिश्किल टीपणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, यंत्राचा विकास अधिक होत असल्याने पारंपरिक वस्त्रउद्योग अडचणीत आला आहे. विणकर बांधवांचे अनेक प्रश्न आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अर्थ संकल्पाचा माध्यमातून वस्त्रोद्योग विभागामध्ये भरीव तरतूद आपण केले आहे. २५ हजार कोटी रुपयांचे वस्त्र धोरण आपण स्वीकारलं असून यातून ५ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. अजूनही काही विणकरांच्या मागण्या आहेत. विणकरांच्या मगण्या सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल.
यावेळी  पदाधिकारी कार्यकर्ते व विणकर बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.



राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकरांचा सन्मान


येवला येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकर शांतीलाल, दिगंबर भांडगे, राजेश भांडगे, रमेशसिंग परदेशी, बाळकृष्ण कापसे यांच्यासह विणकरांचा सन्मान करण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने