सावरगावला प्रभातफेरी,वृक्षारोपण, दहावी-बारावीतील गुणवंताचा गौरव! विविध उपक्रमांनी सावरगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

सावरगावला प्रभातफेरी,वृक्षारोपण,
दहावी-बारावीतील गुणवंताचा गौरव!
विविध उपक्रमांनी सावरगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा


येवला : पुढारी वृत्तसेवा

सावरगाव येथील 
न्यु इंग्लिश स्कुल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन समारंभ प्रभातफेरी,वृक्षारोपण,कवायत,
विद्यार्थी गुणगौरवसह उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. 
शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेचे सचिव प्रमोद पाटील व सहसचिव प्रवीण पाटील,माजी सभापती संभाजी पवार यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.प्रारंभी सकाळी भारत माता की जय..जयघोष करत सावरगावमधून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात ध्वजारोहण करण्यात आले.विद्यालयाच्या प्रांगणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सोमनाथ काकड,सामाजिक कार्यकर्ते बबन काटे,कचेश्वर काटे,पोलिस पाटील विशाल काटे,अंबादास निकम,जालिंदर पवार,प्राचार्य डी.बी. नागरे,पर्यवेक्षक सविता सौंदाणे,ग्रामविकास अधिकारी रविंद्र शेलार,वैद्यकीय अधिकारी डॉ.निकिता मोहिते, अशोकबाबा भुरुक,ज्ञानेश्वर काकड,छगन गोविंद,काळू काटे,संदीप लिंगायत, श्री.अहीरराव,राजेंद्र पैठणकर,बबन गायकवाड आदीची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, भारतमाता,छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजपूजन करण्यात आले.यावेळी वीर जवान पत्नी सुचित्राताई पानमळे यांची विशेष उपस्थिती होती.त्यांनी विद्यालयाला ३१०० रुपयांची देणगी यावेळी दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर परिपाठ सादर करून प्रतिज्ञा,पार्थना सुविचार,दिनविशेष सादर केला. क्रीडा शिक्षक कैलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगसुंदर कवायत विद्यार्थ्यांनी सादर केली.इंडियन आयडॉल फेम आम्रपाली पगारे व वैभव गायकवाड या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गायलेले गीत सर्वांना भावुक करून गेले.इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बाळासाहेब पवार,बबननाना काटे तसेच दिनकरराव पवार यांच्या वतीने रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली.
स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेल्या शूरवीरांच्या त्यागाला व बलिदानाला अभिवादन करतांना प्रत्येकाने देशभक्ती जपत देशनिष्ठा व कर्तव्याचे पालन करावे असे यावेळी प्राचार्य नागरे म्हणाले.यावेळी वीरपत्नी सुचेत्रा पानमळे तसेच विद्यार्थीनी प्रतीक्षा दाभाडे,भक्ती तिवारी, वैष्णवी गायकवाड,अंश तिवारी यांनी स्वागत दिनाविषयी मनोगत व्यक्त केले.शिक्षक गजानन नागरे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन वसंत विंचू यांनी केले.आभार संतोष विंचू यांनी मानले.यावेळी पोपट भाटे,सुमेध कुऱ्हाडे,श्रीमती अंजना पवार,योगेश भालेराव,संजय बहीरम,नाना लहरे,उज्वला आहेर,योगेश पवार,रविंद्र दाभाडे, सगुना काळे,अर्चना भुजबळ,अनंत कोळी, मयुरेश पैठणकर,वैभव गायकवाड,रोहित गरुड,निलेश व्हनमाने,सागर मुंढे,जनार्धन गंडाळ,मच्छीन्द्र बोडके,लक्ष्मण सांगळे,आकाश नागपुरे आदीनी नियोजन केले.
फोटो
सावरगाव : न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात ध्वजारोहण करताना सभापती सविता पवार व पदाधिकारी.
थोडे नवीन जरा जुने