महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रसेवा दल महाराष्ट्र यांच्या वतीने येवला तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रसेवा दल महाराष्ट्र यांच्या वतीने येवला तहसील कार्यालयात धरणे आंदोलन 

येवला : पुढारी वृत्तसेवा


गेल्या काही दिवसांपासून पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणाऱ्या घटना या दिवसेंदिवस घडतच आहे बदलापूर असो व पुणे नागपूर असो किंवा मुंबई या मोठ्या शहरांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस समोर येत आहे. पूर्वी मोठ्या महिला सुरक्षित नव्हत्या आता चिमुरड्या देखील सुरक्षित नसून सरकार व पोलीस यंत्रणा अद्यापही गंभीर नाही दोशींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी तथा मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकत्र येऊन राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून येवला तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन दिले आहे .
तसेच शक्ती कायदा लवकरात लवकरच अमलात आणावा अशी मागणी देखील करण्यात आली .
याप्रसंगी ,सुधा पाटील ,रेखा दुनबळे, मंदा पडवळ ,सोनाली सोनवणे, वृषाली जाधव ,अर्जुन कोकाटे, दिनकर दाने, बाबासाहेब कोकाटे, सुखदेव आहेर ,हेमंत पाटील, उत्तम बंड, विलास कोकाटे, विजय जाधव, रामनाथ पाटील आदींसह मोठ्या संकेत विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने