महाविकास आघाडीचा येवल्यात काळा फिती लावून मूक मोर्चा


 महाविकास आघाडीचा येवल्यात काळा फिती लावून मूक मोर्चा 

येवला : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली परवानगी नसली तरी आंदोलन करू शकतो अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी काळया फीती लावून मूक मोर्चा आंदोलन केले. 
या पार्श्वभूमीवर येवला शहरात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे,(राष्ट्रवादी शरद पवार गट) शिवसेना उबाठा युवा नेते कुणाल दराडे,  संभाजीराजे पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे समीर देशमुख , स्वारीप चे महेंद्र पगारे आदींच्या नेतृत्वाखाली काळ्याफिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले . याप्रसंगी  महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने