श्रीक्षेत्र पारेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहस विणा पूजन व ध्वज रोहन करून सुरुवात

श्रीक्षेत्र पारेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहस विणा पूजन व ध्वज रोहन करून सुरुवात 


येवला : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र पारेगाव या ठिकाणी गेल्या बारा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी देखील मोठ्या उत्साहात 
संत श्रेष्ठ हरिभक्त परायण नारायणगिरीजी महाराज यांच्या  आशीर्वादाने ह भ प रंगनाथ महाराज मालखेडा व भाऊसाहेब महाराज आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह ची सुरुवात दिनांक 23 ऑगस्ट पासून करण्यात आले असून सप्ताहाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.
या कालावधीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ह भ प अनिल महाराज दातार, निफाडकर, ह भ प आकाश महाराज भोडवे, रायगड, बाल कीर्तनकार ह भ प भाग्यश्रीताई काळे, ह भ प कृष्णानंद महाराज बेलापूर, ह भ प तुकाराम महाराज वाजे वाघदर्डी, ह भ प तात्या महाराज शिंदे भुईगव्हाण, ह भ प रेखाताई काकड, यांचे अनुक्रमे दररोज रात्री नऊ ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे .
तसेच दिनांक 30 ऑगस्ट या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी भव्य मिरवणूक तथा ह भ प गुरुदेव महाराज आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे .
या सप्ताहासाठी परिसरातील अनेक दात्यांनी मदत केली असून.. पारेगाव येथील ग्रामस्थांचे देखील सहकार्य सप्ताह साठी लाभले आहे सप्ताहासाठी, हभप घनश्याम बंड,
ह भ प बापू महाराज, पोटे,जनार्धन खिल्लारे, दौलत सुरासे,सतीश सुराशे,बाबासाहेब खिल्लारे, सुनील पाठे, गोटिराम पाठे, रावसाहेब वाळके, बालासाहेब खिल्लारे, अण्णासाहेब काळे, बाबूलाल गुजर,अण्णा ढगे,
आदी
थोडे नवीन जरा जुने