अॅड.माणिकराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

अॅड.माणिकराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न...


येवला : पुढारी वृत्तसेवा
      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा येवला तालुक्यातील ज्येष्ठ नेते एडवोकेट माणिकराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व रायगड ग्रुप येवला शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने तथा शासकीय रक्तपेढी सेवा संदर्भ रुग्णालय नाशिक व सामान्य रुग्णालय मालेगाव यांच्या सहकार्याने एडवोकेट माणिकराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर येवल्यात पार पडले .

    याप्रसंगी राष्ट्रपती पारितोषक पुरस्कार विजेते श्री शांतीलाल भांडगे यांच्या हस्ते  शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले... सदरचे शिबिर अरविंद भाई शिंदे यांचे सह्याद्री या निवासस्थानी संपन्न झाले.सदरच्या रक्तदान शिबिरास पक्षाचे कार्यकर्ते श्री अक्षय लकारे यांचा याच दिनी विवाह असताना देखील रक्तदान करून शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला.

      सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे तथा रायगड ग्रुपचे सर्वेसर्वा अरविंद भाई शिंदे , संकेत सोनवणे , पंकज माळी यांनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने