मयतांच्या वारसाना सभासद करण्यासाठी पहिल्याच बैठकीत प्रयत्न
कोंडाजीमामा आव्हाड : व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नगरसुलला सत्कार
येवला : पुढारी वृत्तसेवा
सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पॅनलला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर संधी दिली आहे.सभासदांच्या विश्वासाला तडा न जाऊ न देता पहिल्याच बैठकीत आम्ही मृत सभासदांच्या वारसांना नव्याने सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.सभासदांना दिलेला शब्द आम्ही पाळणार असून जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या क्रांतीवर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक भरभराटीसाठी आम्ही काम करू असे प्रतिपादन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केले.
संस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ नगरसुल येथे शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल शिक्षण संस्थेच्या वतीने पार पडला.यावेळी श्री. आव्हाड बोलत होते.व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील,सहसेक्रेटरी प्रवीणदादा पाटील तसेच नवनिर्वाचित उपाध्यक्ष उदय घुगे,विश्वस्त लक्ष्मण जायभावे,संचालक उद्धव कुटे,नारायण पालवे यांच्यासह प्रशांत आव्हाड,सुरेश घुगे,विजय घुगे,पोलीस निरीक्षक महेश मुंढे,अल्केश कासलीवाल,अतुल आकडकर,अशोकराव कातकडे,प्रशांत आव्हाड,शरद घुगे,निलेश दराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रमोद पाटील,प्रवीण पाटील,दीपक पाटील, अशोक पाटील,माजी सरपंच प्रसाद पाटील, विशाल पालवे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या हितासाठी आम्ही जाणकार व अभ्यासू पदाधिकाऱ्यांचा परिवर्तन पॅनल बनविला होता.समाजाच्या सभासदांनी महत्त्वाच्या पदावर आम्हाला काम करण्याची संधी दिली असली तरी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पराभव मात्र आम्हाला जिव्हारी लागल्याचे यावेळी श्री. आव्हाड यांनी सांगितले.
नवोदित असूनही सभासदांनी विश्वास ठेवून उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. संस्थेच्या कामकाजाला शिस्त लावण्यासह सुमारे ७० विद्यालयातील अनेक ठिकाणी शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची गरज असून त्यासाठी प्राधान्याने आम्ही पाठपुरावा करू असे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी भाषणातून सांगितले.श्री.जायभावे यांनीही मनोगत व्यक्त केले.लक्ष्मण घुगे यांनी सभासदांनी योग्य माणसाला चांगल्या पदावर काम करण्याची संधी दिल्याचे सांगत वारसांना सभासद करून घ्यावे तसेच नव्याने सभासद नोंदणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी किरण सानप,प्रकाश वाघ,अरविंद नागरे,कचेश्वर मुंढे,वाल्मिक बोडके,जगन मुंढे,शेखर नागरे,विशाल पाटील,मनीष पाटील,किसन गंडाळ,योगेश इप्पर,संपत कांगणे,शिवाजी मुंढे,अशोक मुंढे,वसंतराव धात्रक,प्राचार्य डी.बी.नागरे,मारोती अलगट,मच्छिंद्र आवारे,अनिल साळुंखे,प्रकाश नागरे,मंगेश नागपुरे,वाल्मिक नागरे आदींची उपस्थिती होती.संतोष विंचू यांनी प्रास्ताविक व वसंत विंचू यांनी सूत्रसंचालन केले.
● पाटील बंधूच्या योगदानाचे कौतुक!
नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत नगरसुल येथील प्रमोद पाटील व प्रवीण पाटील यांचे भाचे उदय घुगे उपाध्यक्ष पदासाठी विजयी झाले आहे.या निवडणुकीत पॅनलच्या विजयासाठी पाटील बंधूंनी येवला,नांदगाव,
निफाड,सिन्नर तालुक्यात मोठी मेहनत घेऊन उमेदवारांच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्याचे कौतुकउद्गार यावेळी श्री.आव्हाड यांनी काढले.लक्ष्मण घुगे यांनीही पाटील बंधूसह त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे यावेळी कौतुक केले.
फोटो
नगरसुल : व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष कोंडामामा आव्हाड,उपाध्यक्ष उदय घुगे आदींचा सत्कार करताना येथील माजी सरपंच प्रमोद पाटील व प्रवीण पाटील.