बांगलादेश मधील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराबाबत येवला तहसीलदारांना निवेदन
येवला : पुढारी वृत्तसेवा
बांगलादेश मधील सत्ता पालटा नंतर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहे याचे पडसाद जगभरात उमटत असून भारतामध्ये देखील या घटनेचा विविध स्तरातून निषेध होत आहे मात्र केंद्र शासनाने यात हस्तक्षेप करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावे व त्यांचे संरक्षण करावे या मागणीसाठी येवला सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर शेकडो हिंदू बांधवांच्या सह्या असून याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे ऍड शैलेश भावसार यांनी सरकारकडे बांगलादेश मधील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली आहे