एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची कॅम्पसमधून निवड!
पुण्याच्या व्हीटीपी रियल्टी कंपनीने दिले तीन लाखांचे पॅकेजसह सुविधा
येवला : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्याच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांची पुणे येथील व्ही.टी.पी. रियल्टी या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालयाने सर्वांगीण सुविधा उपलब्ध केल्या आहे.शिवाय वर्षभरात नामांकित कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह देखील आयोजित केले जातात.या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे,यासाठी विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्रासह विविध कौशल्यांची माहिती,प्रशिक्षण देखील देण्यात येते.
पुणे येथील व्ही.टी.पी. रियल्टी या कंपनीने नुकतीच गुणवतेच्या आधारे महाविद्यालयातील
धनश्री सांगळे,सागर लुकारे,राज देशमुख व ऋषिकेश गांगुर्डे यांची निवड केली आहे. त्यांना वार्षिक ३ लाखाचे पॅकेज तसेच इतर सुविधा देण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना विभागप्रमुख डॉ.यु.एस. अन्सारी यांनी सांगितले कि स्थापत्य अभियांत्रिकी (सिविल) ही इतर सर्व शाखांची मातृशाखा आहे.स्थापत्य अभियांत्रिकीच्या शाखांद्वारे अन्न, वस्त्रे आणि निवारा यासारख्या मानवाच्या तिन्ही मूलभूत गरजा पूर्ण होतात.कंत्राटदार, बांधकाम,स्थावर मालमत्तेचे नियोजन, सनदी अभियंता हे प्रमुख संबंधित व्यवसाय आहेत ज्यामध्ये स्थापत्य अभियंत्याची अत्याधिक मागणी आहे. तसेच, पीडब्ल्यूडी, सिंचन, रेल्वे, गोदी आणि बंदर आणि विमानतळ यांचे बांधकाम अशा सरकारी क्षेत्रात सुद्धा स्थापत्य अभियंत्याची आवश्यकता भासते.त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना अधिक संधी असून नोकरी-व्यवसायात करिअर करता येते असे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.डी.एम. यादव, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. अन्सारी,प्लेसमेंट अधिकारी प्रा.राहुल थोरात यांनी अभिनंदन केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोर दराडे,सचिव लक्ष्मण दराडे,संचालक कुणाल दराडे,रुपेश दराडे यांनी शुभेच्छा दिल्या.
"इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतांनाच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना नोकरीची चांगली संधी उपलब्ध होत आहे.महाविद्यालय विविध नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीच्या आयोजनासाठी नेहमी प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी आमचा सतत प्रयत्न आहे.अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळात असल्याचे समाधान आहे."
-कुणाल दराडे,संचालक,मातोश्री शिक्षण संस्था,येवला
सोबत फोटो