विकास हाच माझा ध्यास, श्वास, हीच जात आणि हाच धर्म - मंत्री छगन भुजबळ




विकास हाच माझा ध्यास, श्वास, हीच जात आणि हाच धर्म - मंत्री छगन भुजबळ


येवला  : पुढारी वृत्तसेवा
 मतदारसंघात विकासाचा ध्यास घेऊन आपण आलो होतो. विकास हाच आपला श्वास, हीच जात आणि हाच धर्म आहे. या मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे केल्या काळात आपण पूर्ण केली आहे. सध्याही कोट्यावधी रुपयाची कामे मतदारसंघात सुरू आहे, ही विकासाची कामे या पुढील काळातही अविरतपणे सुरू राहतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला लासलगाव मतदारसंघातील जळगाव नेऊर, सायगाव व येवला शहरात विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे,  सरपंच रंजना शिंदे, उपसरपंच विमल घुले, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे, गोटू मांजरे, सुमित थोरात, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, कार्यकारी अभियंता व्ही.के.आव्हाड, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक लोणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नवलसिंग चव्हाण, डॉ.शरद कातकडे, डॉ. तुषार बाविस्कर, विस्तारअधिकारी राजेंद्र नागपुरे,भगवान बच्छाव, आरोग्य सहायक प्रशांत सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अशोक आडसरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महायुती शासनाच्या वतीने राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विज बिल माफीचा निर्णय घेऊन मोफत वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे निधी एकत्रित खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ज्या महिलांची अद्यापही नोंदणी बाकी आहे. त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.


ते म्हणाले की, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मार्फत लाभार्थी कुटुंबांना तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे मुलींना पूर्णपणे शिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी केले. 


*मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण*


राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज जळगाव नेऊर ता.येवला येथे स्थानिक विकास निधीमधील पिक अप शेडचे व आरोग्य उपकेंद्र नवीन इमारतीचे उदघाटन, सायगाव ता.येवला येथे अनकाई- कुसूर- कुसमाडी नगरसूल- सायगाव - अंदरसुल (भाग नगरसूल ते अंदरसुल)  रस्ता रामा ४५१ ची सुधारणा करणे या कामाचे लोकार्पण व येवला शासकीय विश्रामगृह येथील नवीन इमारत बांधकामाचे भुमीपूजन करण्यात आले.
   

*मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आदिवासी व भटक्या विमुक्त समाजातील बांधवांना रेशनकार्डचे वाटप*

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार येवला मतदार संघातील ज्या आदिवासी व भटक्या विमुक्त समाज बांधवांकडे रेशन कार्ड नाही अशा बांधवांसाठी येवला व विंचूर संपर्क कार्यालय येथे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अर्ज केलेल्या बांधवांना आज मध्ये छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही बांधवांना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार आबा महाजन उपस्थित होते.


*मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प येवला शहरात साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. अंतिम टप्प्यात असलेले या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, आर्कि.सारंग पाटील, उपकार्यकारी अभियंता सागर चौधरी, कंत्राटदार पंकज काळे, मकरंद सोनवणे, मच्छिंद्र थोरात, सचिन सोनवणे, मलिक मेंबर, गोटू मांजरे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने