एवढे वर्ष मंत्रीपद तरीही रस्ते,पाणी नाही हे वाईटच!
येवल्यातील सभेत आदित्य ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
येवला - प्रतिनिधी - सभेला यायला उशीर झाला कारण नाशिक ते येवला रस्ता अवस्था बिकट झाली आहे. मुंबई ते नाशिक रस्त्याची अशीच अवस्था आहे.एवढी वर्ष सत्ता,मंत्रीपदे असतांना रस्ता करता आला नाही हे वाईट आहे.मंत्र्यांचा तालुका असताना व अनेक वर्ष मंत्रिपद असतानाही अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे,रस्ते नाही..मग विकास कुठे आहे.राज्यात हीच स्थिती असून खोके सरकारने राज्याची वाट लावली आहे.राज्याच्या चंद्रपूर,कोकण,मुंबई अन कुठल्याही भागात जा जनतेचे हाल सुरूच आहे त्यामुळे खोके सरकारला जनता जागा दाखवेल असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
येथील बाजार समितीच्या आवारात आयोजित महाराष्ट स्वाभिमान सभा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर दत्ता गायकवाड सुधाकर बडगुजर विलास शिंदे,वसंत गीते, माजी आ कल्याणराव पाटील, नरेंद्र दराडे, जयंत दिंडे, संभाजी पवार,सविता पवार,शिवा सुरासे, भास्कर कोंढरे,रतन बोरणारे, राजेंद्र लोणारी, छगन आहेर, झुंजार देशमुख, संजय कासार,अरुण काळे, ऍड बापु गायकवाड,राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुभाष निकम,विठ्ठलराव शेलार,काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगलसिंग परदेशी, सुयोग गायकवाड आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी अंगणगाव येथे राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सभेला सुरुवात झाली.
संपूर्ण सभेत महायुतीसह शिंदे सरकारच्या कारभारावर ठाकरे यांनी टीका केली.
हे सरकार शेतकरी व उद्योग उद्योजकांच्या विरोधातले असल्याचे टीका करताना
फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असे ते म्हणतात,पण ती अटी शर्थी लावून होती.मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठलीही निवडणूक समोर नसतांना महाविकास आघाडीची सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती असून शेतकऱ्यांना घरबसल्या या माफीचा लाभ मिळाल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
कांद्याची निर्यातबबंदी उठवताना प्रथम मोदी सरकारने गुजरातमध्ये मागे घेतली. त्यानंतर अडीच महिन्यानी महाराष्ट्रातील कांदा निर्यातबंदी दूर केली मग हा दुजाभाव नाही का असा सवाल करत या राज्यात महिला ,मुली सुरक्षित नाही.आमच्या महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती विधेयक आणले.अजून हे विधेयक या सरकारला मंजूर करता आले नाही.लाडकी बहीण योजना आणली मात्र दहा वर्षांपूर्वी १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यावर येतील असे म्हटले होते.आता १५ लाखांवरून १५०० रुपयांवर आले आहेत. त्यातही अटी वाढवत आहेत. आम्ही भविष्यात ही रक्कम वाढवून देऊ असे सत्ताधारी सांगत आहेत मात्र तुमचे सरकार येत नाही अन हिम्मत असेल तर आताच पैसे वाढवून दाखवा असे आवाहनही ठाकरे यांनी दिले.निवडणूक झाल्यावर आम्ही सरकारमध्ये येणारच आहे अन लाडकी बहिणीला पैसे वाढवून देनारच असे आश्वासन यावेळी दिले.
दोन वर्षात राज्यात एकही नवा उद्योग आलेला नाही.उलट आलेले उद्योग गुजरातला गेले.खोके सरकार नाशिकची महिंद्रा सुद्धा तिकडे घेऊन चालल्याची चर्चा सध्या सुरू असल्याचे म्हणाले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडे उद्योजक गेले की दुसरे उपमुख्यमंत्री नाराज होतात अशी उद्योजकांची खंत असल्याची टीका त्यांनी केली.बदलापूर मध्ये लहान मुलींवर अत्याचार करण्यात आलेली भाजपच्या आपटे यांची शाळा आहे. चार पाच दिवसानंतर खेट्या मुलींच्या गर्भवती आईला पोलीस ठाण्यात दहा बारा तास बसवून गुन्हा दाखल केला. हे कसे लाडके भाऊ होतील तुमचे .महिला पत्रकाराला आशील बोलणारे तुमचे लाडके भाऊ होतील का असा सवाल ठाकरे यांनी लाडक्या बहिणींना यावेळी केला.
निवडणुका केव्हा लागणार असा सवाल उपस्थितांना करत ठाकरे यांनी दोन राज्याच्या निवडणूका जाहीर झाल्या.महाराष्ट्र नाही कारण भाजपने निवडणूक आयोगाला परवानागी दिलेली नाही.कारण यांच्या मनात भीती आहे
भाजप हिंदू-मुस्लिम,जातीजातीत वाद लावन्याचे काम सध्या सुरू आहे. लोकसभेला दाखवली तशीच महाराष्ट्रातील जनतेला एकजूट कायम ठेवावी लागेल,यासाठी वज्रमुठ कायम ठेवत परिवर्तनाची तयारी ठेवा असेही ते म्हणाले.
● शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घ्यावी - दराडे
पाण्यासाठी नेहमी आंदोलने करण्याची वेळ येणारा हा तालुका असून या पाण्याचे स्वप्न पाहत अनेक प्रकल्प रखडले आहेत.अनेक वर्षापासून रखडलेल्या दरसवाडी- डोंगरगाव कालव्यासह मांजरवाडा प्रकल्प महायुतीच पूर्ण करणार असा विश्वास व्यक्त करत पाण्यासाठी आंदोलने करणारा हा तालुका असल्याने विशेष उपाययोजना कराव्या लागतील असे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी यावेळी सांगितले.शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धत सुधारावी,जिल्हा बँकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करावे,हमीभावाची पद्धत बदलून तो प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशी तरतूद करावी,शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा तसेच पीक विम्याचे व दुष्काळी अनुदानाचे पैसे द्यावेत अशी मागणी दराडे यांनी यावेळी केली.यावेळी शिवा सुरासे,महेंद्र पगारे,चंद्रकांत शिंदे,वाल्मिक गोरे ,मनीषा वाघ,प्रियंका जोशी,सुनीता शिंदे आदींचे भाषणे झाली.