वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे येवल्या तीनशे झाडांचे वृक्षारोपण


वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

येवल्या तीनशे झाडांचे वृक्षारोपण
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला नगरपरिषद  व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था व हरित येवला सुंदर येवला ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगासागर तलाव येथे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. साधारणता पिंपळ सिताफळ करंज कांचन फापडा आधी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी स्वच्छता ब्रँड अँबेसिडर अविनाश शिंदे ब्रँड अँबेसिडर श्रीकांत खंदारे पर्यावरण दूत सचिन सोनवणे येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे संतोष राऊळ राहुल लोणारी भूषण शिनकर डॉ चंडालिया डॉ. संगीता पटेल पर्यावरण दूत शरद हिवाळे एडवोकेट गवळी सागर राहुल युवराज पगारे आबा सोनवणे नवनाथ पोळ किरण अहिरे मुकुंद पवार आशिष अंनकाईकर प्रकल्प अधिकारी शितल झावरे शहर समन्वय गौरव चुंबळे योगेश कोटमे नितीन लोणारी सोमनाथ भुरुक  श्री जांभुलकर व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत या अभियानासाठी माझी वसुंधराचे नोडल अधिकारी श्री गोविंद गवंडे यांनी वृक्ष उपलब्ध करून दिले तसेच स्वच्छता निरीक्षक सागर झावरे यांनी सदर मोहिमेसाठी जेसीबी उपलब्ध करून सहकार्य केले या कार्यक्रमासाठी स्वच्छ भारत अभियानाचे प्रकल्प अधिकारी श्री संदीप बोढरे यांनी उपस्थितांना माझी वसुंधराची शपथ दिली.

"आपण तयार केलेली रोपे लागवड केल्यास त्याच्या विषयीच्या आत्मीयतेमुळे त्याची निगराणीही आपोआपच होईल. ज्याला जमेल तसा सहभाग घेतला पाहिजे त्यामुळे वातावरणात विविध कारणांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर तापतानवाढ ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यास सर्वात कारणीभूत म्हणजे वाढती जंगलतोड. यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड गरजेची आहे. प्रत्येक माणसाला दिवसागणिक दोन झाडांचा तीन किलो ऑक्सिजन दररोज लागतो."

मुख्याधिकारी 
किरण देशमुख

थोडे नवीन जरा जुने