मुखेडला दहावीचे परीक्षा केंद्र व्हावे पालक मेळाव्यात पालकांची आग्रही मागणी.



मुखेडला दहावीचे परीक्षा केंद्र व्हावे पालक मेळाव्यात पालकांची आग्रही मागणी.


येवला - पुढारी वृत्तसेवा

मुखेड ता.येवला येथील शाळेतच दहावीचे परीक्षा केंद्र व्हावे अशी पालकांच्या वतीने पालक मेळाव्यात आग्रही मागणी केली.
मविप्र समाज नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड ता.येवला शाळेत शनिवार दि.२७ रोजी पालक मेळावा उत्साहात पार पडला.इयत्ता दहावीचे पेपर देण्यासाठी विद्यार्थ्यांना देवगाव ता.निफाड येथे जावे लागते.परीक्षेसाठी जाण्या येण्यातच विद्यार्थ्यांचा जास्त वेळ वाया जातो. त्यामुळे मुखेड ता.येवला या शाळेतच दहावीचे परीक्षा केंद्र व्हावे अशी पालकांच्या वतीने आग्रही मागणी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष विश्वासराव आहेर हे होते.यावेळी व्यासपीठावर उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णराव गुंड,उच्च माध्यमिक शालेय समितीचे सदस्य छगन आहेर,अरूण आहेर, प्राचार्य एम.ए.भगत,पर्यवेक्षक आर.सी.महाले, ज्येष्ठ शिक्षक एस.एम.शेळके,डि.वाय.खताळ, आप्पासाहेब बडवर आदी उपस्थित होते.प्राचार्य एम.ए.भगत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम,स्पर्धा परीक्षा,विद्यार्थी गुणवत्ता याबाबत सविस्तर माहिती पालकांना दिली.पर्यवेक्षक आर.सी.महाले यांनी शालेय शिस्तीबरोबर,विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले. तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन यावेळी केले.माता पालक मेळावा ही यावेळी घेण्यात आला.उपस्थित माता पालकांना ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी धरम,सविता बलकवडे यांनी मार्गदर्शन केले.माता पालकांचे स्वागत शिक्षिका वर्षा बडवर यांनी केले.उपस्थित माता पालकांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. पालक मेळाव्यास पालकांनी प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.अध्यक्षीय भाषणात विश्वासराव आहेर यांनी मुखेडला दहावीचे परीक्षा केंद्र व्हावे यासाठी येवला तालुका मविप्र संचालक नंदकुमार बनकर यांचे मार्गदर्शनाखाली मविप्र संस्था व शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.शाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै ते २८ जुलै २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.या अनुषंगाने विद्यालयात या उपक्रमांतंर्गत दररोज विविध उपक्रम साजरे करण्यात आले.पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साहित्य,पुठ्ठाकाम,कागदकाम तसेच शब्दकोडी तयार करणे या उपक्रमात सहभाग घेतला.दुसरा दिवस मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या दिवशी परिपाठात निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली.शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध क्रिडास्पर्धेत सहभाग घेतला. चौथा दिवस सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला.पाचवा दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस,सहावा दिवस शनिवारी इको क्लब उपक्रम व शालेय पोषण दिवस अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक एस.एम.शेळके यांनी केले.आभार प्रदर्शन आप्पासाहेब बडवर यांनी मानले.
फोटोखाली-मुखेड जनता विद्यालयात  इको क्लब उपक्रम अंतर्गत वृक्षारोपण करताना उपस्थित मान्यवर.
थोडे नवीन जरा जुने