येवल्यात ज्ञानेश्वरी पारायण बसलेल्या महिलांना वृक्ष भेट


येवल्यात ज्ञानेश्वरी पारायण बसलेल्या महिलांना वृक्ष भेट


येवला :  पुढारी वृत्तसेवा
 श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त  येथील  श्री नामदेव -  विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगितमय भागवत कथा व हरिपाठ व भजन किर्तन सोहळा आदींचे आयोजन करण्यात आले होते.बुधवार दिनांक ३१ रोजी ज्ञानेश्वरी पारायानाची समाप्ती झाली. पारायनास बसलेल्या सर्व पुरुष व महिलांना येथील शिंपी समाजाचे वतीने वृक्ष भेट देण्यात आले.


पारायण करते भाविक भक्तांना सकाळी चहा नाश्ता व दुपारी फराळ जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष सुहास भांबारे यांनी वृक्षा रोपण करणे ही आज काळाची गरज बनली आहे. तेव्हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने घरा बाहेर,पटांगणात वृक्ष रोपण करून त्याचे संगोपन करावे असे सांगितले.नगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर श्रीकांत खंदारे यांनी यावेळी मार्ग दर्शन केले. उपाध्यक्ष स्वामी शिंदे, रामेश्वर भांबरे मुकेश लचके तुषार भांबारे, सुनीता लचके,अर्चना भांबारे , अनुराधा खंदारे, मानसी भांबारे, सुलभा माळवे ,शितल भांबरे , निर्मला करमासे, सारिका टिभे, आनुच्या भांबरे, ज्योती हाबडे, वंदना भांबरे, संगीता खांबेकर आशबाई  भांबारे, सुशीला टीभे, शोभा शिंदे, उषा खंदारे, 
शितल काळे, सायली खदारे , सोनल माळवे , श्यामाबाई लचके ,संगीता कल्याणकर ,श्रुती खंदारे ,प्रणाली खांबेकर, प्रज्ञा भांबरे, रेणुका शिंदे, अरुणा भांबरे ,सुनीता भांबरे ,सुरेखा तूपसाखरे, ,ज्योती खंदारे आदींसह भाविक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पारायण करते भाविक भक्तांना सकाळी चहा, नाश्ता व दुपारी फराळ तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
थोडे नवीन जरा जुने