शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी येवला तालुका कॉंग्रेस कमिटीची धरणे आंदोलनाद्वारे मागणी





शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी

 येवला तालुका कॉंग्रेस कमिटीची धरणे आंदोलनाद्वारे मागणी


येवला : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थ संकल्पात देशातील शेतकऱ्यांसाठी भरीव अशी कोणतीही तरतुद केली नाही तसेच कर्जमाफी बदलही कोणताही निर्णय घेतला नाही. केंद्र व राज्य सरकारचे धोरण हे संपुर्णपणे शेतकर्‍यांविरुद्ध असून अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिली नाही. 
        देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन्न, पाऊस, थंडी, वादळीवारा यांचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काम करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जिवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी जगाला तरच जग जगेल परंतु केंद्र व राज्य सरकारच्या नियतित खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही तसेच शेतकऱ्यांनची कर्जमाफी सुद्धा केली नाही. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे. तरी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासाठी येवला तहसीलदार कार्यालय येथे कॉंग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी विविध घोषणां देण्यात आल्या. तसेच १ ऑगस्ट २०२४ रोजी येवला तहसीलदार कार्यालया समोर येवला तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह ईतर जनतेच्या विविध प्रश्नांवर धरणे आंदोलन केले जाणार आहे. 
        नायब तहसीलदार विवेक चांदवडकर यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख, जेष्ठ नेते बाळासाहेब मांजरे,   माजी शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, छावा संघटनेचे अध्यक्ष संजय सोमासे, बाबासाहेब शिंदे, दत्तात्रय चव्हाण, एन.एस.यु.आय तालुकाध्यक्ष नाना शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुकदेव मढवई, भाऊराव दाभाडे, अशोक नागपुरे, अ‍ॅड.  शंतनु कांदळकर, कैलास घोडेराव, जयप्रकाश वाघ, शरद राऊळ, जालिंदर गुडघे, निसार शेख, अनिल घोडेराव, मुरलीधर जाधव, बबन घोलप, विनोद बोढरे, संजय लभडे, विवेक चव्हाण, बाळासाहेब काळे, नितीन संसारे आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने