येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सविता पवार तर उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड





येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सविता पवार तर उपसभापतीपदी संध्या पगारे यांची बिनविरोध निवड

येवला : पुढारी वृत्तसेवा
 येवला कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार मारोतराव पवार यांच्या सून माजी जि प सदस्या सविता बाळासाहेब पवार यांची संचालक मंडळामधून बिनविरोध निवड करण्यात आले असून उपसभापतीपदी शेतकरी संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या संध्या बापूराव पगारे यांची निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली . संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर सभापतीपदासाठी सविता बाळासाहेब पवार, व उपसभापती पदासाठी संध्या बापूराव पगारे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांतीलाल गायकवाड यांनी सभापतीपदासाठी सविता पवार यांच्या नावाची घोषणा केली घोषणा होताच पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला 
सदरची निवड मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून याप्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, ओ एस डी राजपूत साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, युवा नेते संभाजी पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष रतन बोरणारे, माजी सभापती किसनराव धनगे, माजी उपसभापती बापूराव गायकवाड, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जि प सदस्य संजय बनकर, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन जनार्दन खिल्लारे, अरुण बापू काळे, संतू पाटील झांबरे, ज्येष्ठ नेते अरुण  थोरात,संचालक वसंत पवार, नवनाथ काळे, प्रवीण गायकवाड,अल्केश कासलीवाल ,शरद लहरे, पीके काळे,दीपक जगताप, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, नितीन गायकवाड, आधी सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे व संचालक उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने