येवला : पुढारी वृत्तसेवा
आषाढी एकादशी निमित्त येथील धडपड मंचच्या वतीने शहरातील खांबेकर खुंट व जब्रेश्वर खुंट येथे विठ्ठलाची प्रतिमा ठेवुन भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सुंदर आकर्षक सजावट, परिसरात लावलेले भगवे झेंडे, ध्वनीक्षेपणावर सुरु असलेली धार्मिक गाणी यामुळे वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते. येथे करण्यात आलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती.
सकाळी येथील माऊली राजेंद्र पाटोदकर, अरुण हाबडे व डॉ. सागर बोळे यांचे शुभहस्ते विठ्ठलाचे प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुकेश लचके, गोकुळ गांगुर्डे, सोमनाथ हाबडे, अमर छतानी, श्रीकांत खंदारे, दीपक पाटोदकर, दत्तात्रय नागडेकर, ज्ञानेश्वर करमासे, हेमंत हलवाई, सागर थोरात, आदी उपस्थित होते. उपस्थितांचे धडपड मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी आभार व्यक्त केले.