येवला नामदेव शिंपी समाज अध्यक्षपदी सुहास भांबारे याची दुसऱ्यांदा सलग निवड
येवला : पुढारी वृत्तसेवा
श्री संत नामदेव शिंपी समाजाची नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष पदी सलग दुसऱ्यांदा श्री सुहास कृष्णदास भांबारे यांची निवड करण्यात आली आहे.
श्री संत नामदेव शिंपी समाजाची सर्व साधारण सभा बुधवार दिनांक १० जुलै रोजी रात्री ९:३० वाजता श्री संत नामदेव - विठ्ठल मंदिरात सुहास भांबारे यांचे अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. या बैठकीत प्रारंभी समाजातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून सभेत सुरुवात करण्यात आली.मागील इतिवृत्त वाचून मंजुरी देण्या आली .सालाबाद प्रमाणे यंदाही श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले तसेच इतर विषयांवर चर्चा होऊन सन २०२४ ते २०२६ करिता सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुहास भांबारे, उपाध्यक्ष स्वामी शिंदे, चिटणीस प्रदीप लचके , सहचिटणीस कैलास बकरे, सदस्य रविंद्र हाबडे,
बळीराम शिंदे, जयवंत खांबेकर ,प्रसाद खांबेकर ,मुकेश लचके ,निलेश माळवे ,राहुल भांबारे आदींची निवड करण्यात आली.
या सर्वसाधारण सभेस अरुण लचके
किशोर रहाणे,दत्तात्रेय लचके ,नंदलाल भांबारे ,अरविंद तुपसाखरे,सोमनाथ हाबडे ,नंदकुमार लचके ,सागर मोतिवाले ,मधुसूदन शिंदे ,रविंद्र करमासे ,श्रीहरी भांबारे ,शिवप्रसाद सदावर्ते ,राजेंद्र गणोरे ,संतोष टीभे, रामेश्वर भांबारे, राजेश माळवे, गौरव हाबडे, मयूर भांबारे , तुषार भांबारे,,योगेश लचके ,कपील लचके ,प्रेम वारे,चेतन खंदारे ,
खंडु शिंदे ,महेंद्र लचके ,निलेश टिभे ,पुरुषोत्तम रहाणे,तुषार शिंदे ,सुदाम भांबारे ,रमेश बोरकर,हेमंत भांबारे,पंकज शिंदे
राजेंद्र कल्याणकर ,मयुर भुसे,राज खांबेकर ,रोहित भांबारे ,
संजय लचके,जयदिप सदावर्ते आदींसह समाज बांधव उपस्थित होते.
**
अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत नामदेव व्यायाम शाळेचे बांधकाम पूर्ण केले. मकर संक्रांति निमित्त महिलांसाठी हळदीकुंक तसेच महिला दिन साजरा करण्यात आला. समाज बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुढील कार्यकाळात हृदय तपासणी चिकित्सा शिबिर ,रक्तदान शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे.
श्री.सुहास कृष्णदास भांबारे,
अध्यक्ष ,श्री संत नामदेव शिंपी समाज,येवला.