लाडक्या बहिणी योजनेचा लाभ नको पण रस्ता तरी चांगला करून द्या
येवला :
आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ नको मात्र आम्हाला दळणवळणासाठी रस्ता करून द्या. अशी संतप्त मागणी
तळवाडे गवंडगाव येथील महिलांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .
तळवाडे- देवळाने रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून गेल्या २५ वर्षांपासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम होऊ शकले नाही.
येवला तालुक्यातील सुमारे एक हजार लोक वस्ती ला जोडणाऱ्या देवळाणे तळवाडे या रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे रस्ता हरवून गेला आहे
गेल्या पंचवीस वर्षापासून हा रस्ता नेहमीच दुर्लक्षित राहिला असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे...
या रस्त्याने शाळकरी मुले , वयोवृद्ध नागरिक, आजारी नागरिक यांना इजा करण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे
सध्या पावसाळ्याचे दिवस असून खड्डे व चिखलाने माखलेला हा रस्ता पायी चालण्यास सुद्धा योग्य नाही त्यामुळे
आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको मात्र रस्ता बनवून द्या अशी संतप्त मागणी येथील महिलांनी केली आहे
दरम्यान लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला याप्रसंगी भामाबाई लक्ष्मण भागवत, मंगलाबाईअरुण भागवत,
शारदाबाई राजेंद्र देहरकर, मीना भागवत,
प्रकाश भागवत, चांगदेव भागवत, रमेश देहरकर, विट्ठल भागवत अप्पासाहेब भागवत, सुरेशआरखडे, सोमनाथ आरखडे,श्रावण आरखडे, संतोष आरखडे, समाधान थोरात
आधी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.