धामोडे येथे भव्य सायकल स्पर्धा व वृक्षारोपण

 धामोडे येथे भव्य सायकल स्पर्धा व वृक्षारोपण 


येवला.....


"सायकलचा वापर करा, दीर्घआयुष्यी बना", "सायकल वापरा, प्रदुषण टाळा" "झाडे लावा, निसर्ग वाचवा" या उद्देशाने प्रेरित होऊन ओम साई स्पोटर्स सायकल येवला, माणुसकी फाऊंडेशन, येवला तालुका मराठी पत्रकार संघ, नगरसुल प्रेस क्लब, ज्ञानसंपदा बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल स्पर्धा व वृक्षारोपण सोहळा सोमवार (दि.२९) रोजी दुपारी २.०० वा.  होणार आहे.



तालुक्यातील गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, धामोडे येथे होणाऱ्या स्पर्धाचे उदघाटन पोलिस उपनिरिक्षक श्री. प्रल्हाद पवार यांचे हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, धामोडेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामदास गायकवाड भूषविणार आहे. 


त्याचप्रमाणे श्री. लहानु येवले (मा. सैनिक), श्री. अल्केश कासलीवाल (माणुसकी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष), श्री. राकेशनाना गिरासे (जेष्ठ पत्रकार), श्री. बंडुनाना शिदे (अध्यक्ष, येवला तालुका मराठी पत्रकार संघ), श्री. बापुसाहेब गायकवाड (कृ.उ.बा. संचालक येवला), श्री. संतोष विंचु

(कार्याध्यक्ष येवला तालुका मराठी पत्रकार संघ), श्री. भाऊलाल कुडके (सरचिटणीस येवला तालुका मराठी पत्रकारसंघ), श्री. लक्ष्मण घुगे (जेष्ठ पत्रकार), श्री. योगेश गंडाळ (अध्यक्ष, प्रेस क्लब नगरसुल), श्री. विजय भोरकडे (सायकल यात्रा प्रमुख, पिंपळगांव जलाल),  श्री. योगेश काळे (सायकल प्रेमी) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे.


कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, धामोडे व ओम साई स्पोटर्स सायकल येवलाच्या वतीने करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने