वृध्दापकाळ पेन्शन योजनेसह सर्व प्रकारच्या विणकर ओळखपत्र असलेल्या विणकरांना उत्सव भत्ता व 200 युनिट मोफत विज योजनेचे लाभ




वृध्दापकाळ पेन्शन योजनेसह सर्व प्रकारच्या विणकर ओळखपत्र असलेल्या विणकरांना उत्सव भत्ता व 200 युनिट मोफत विज योजनेचे लाभ मिळणार.


येवला  : पुढारी वृत्तसेवा


भारतीय जनता पार्टी विणकर प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे यांनी सातत्याने  विणकरांना त्यांच्या पन्नाशीनंतर वृधापकाळ पेन्शन योजना लागू करा, व एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत असलेल्या सर्व  योजनांचे लाभ राज्य सरकारच्या वस्त्र विभागाने दिलेले विणकर ओळखपत्र, मा.विकास आयुक्त नवी दिल्ली व हस्तशिल्प हॅन्डीक्राप्ट नवी दिल्ली यांनी दिलेले ओळखपत्र धारक विनकरांना मिळावे याकरीता सातत्याने पाठपुरावा करत आहे.
काल दिनांक  23 जुलै वार मंगळवारारी या सर्व मागण्यांबाबत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी मंत्रालयातील त्यांच्या समीती कक्ष दालनात वस्त्रोद्योग आयुक्त,सचिव उपसचिव व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत विणकरांना वृध्दापकाळ पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा झाली.विणकराला वयाच्या पन्नाशीनंतर लाभ देण्याची मागणी मनोज दिवटे यांनी  केली परंतू शासकीय नियमानुसार पेन्शन वयाच्या 60 नंतर लागू होते परंतू तरीही या बाबत विशेष बाब म्हणून विचार केला जाईल असे मंत्री महोदय यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग 2023- 28 स्वीकारले असुन राज्यभरात या अंतर्गत विवीध योजनांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.प्रत्यक्ष विणकरांना लाभही मिळत आहे. हातमाग विनकरांना प्रोत्साहन देण्याकरिता या व्यवसायात टिकून राहण्याकरीता गणेश चतुर्थीनिमित्त उत्सव भत्ता योजनेत 10000 रू.पुरूष  व 15000 रू. महीला अशी रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा देखील झाली आहे. तसेच अनेक विनकरांना 200 युनिट वीज बिल माफ योजनेत वीज बिल माफ झालेले आहे.
महाराष्ट्रातील तसेच प्रामुख्यांने येवल्यातील हातमाग विनकरांना उपरोक्त योजनांचा त्याच्याकडे केंद्र शासनाचे अलीकडील काळातील पहचान कार्ड नसल्याने कुठलाही लाभ मिळाला नाही.वंचित गोरगरीब विणकरांना ज्याच्याकडे राज्य शासनाचे, विकास आयुक्त नवी दिल्लीचे व हस्तशिल्प हॅन्डीक्राप्टचे ओळखपत्र आहे अशा सर्व  विणकरांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सुचना ना चंद्रकांत दादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.कुठलाही खराखुरा हातमाग विनकर या योजनांपासून वंचित राहणार नसल्याची हमी या वेळी त्यांनी दिली.यावेळी दादांनी अंत्यत सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीला हातमाग विनकरांचे मोठे शिष्टमंडळ उपस्थित होते.विनकर प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र संयोजक मनोज भागवत तालुका अध्यक्ष संतोष भरते राजेंद्र वडे,वामनराव वाडेकर,रामा मुंगीकर,मयूर कायस्थ,नारायण भावसार,चेतन हंगे,गौरी दिवटे,चंचल वायडे,शितल वडे,सारीका दिवटे,प्रिया काळंगे, प्रतिभा बाकळे, मोक्षदा दिवटे आदी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने