जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण व वृक्ष दान मोहीम
येवला : पुढारी वृत्तसेवा
येवला नगरपरिषद येवला व माजी वसुंधरा 5.0 अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येवला नगरपरिषद येवला येथे येवला शहरातील ब्रँड अँबेसिडर व पर्यावरण दूत यांना आमंत्रित करून त्यांचा एवढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिन हा संपूर्ण देशात साजरा केला जात असतो पर्यावरणाचा संवर्धन व रक्षण करावे या हेतूने अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात असतात त्याच अनुषंगाने दिनांक पाच जून 2024 रोजी येवला नगरपरिषद येवला येथे शहरातील ब्रँड अँबेसिडर व पर्यावरण दूत यांना आमंत्रित करण्यात आलेले होते यावेळी वृक्षरोपण वृक्ष दान मोहीम स्वच्छता मोहीम व कापडी पिशवी वाटप मोहीम असे उपक्रम नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते या कार्यक्रमासाठी स्वच्छता ब्रँडे अँबेसिडर अविनाश शिंदे, ब्रँड ॲम्बेसिडर श्रीकांत खंदारे, प्रसाद शास्त्री कुलकर्णी, पर्यावरण दूत सचिन सोनवणे, राहुल लोणारी, अनुपमा मढे, अर्चना शिंदे, डॉक्टर गोविंद भोरकडे, संतोष राऊळ, शरद हिवाळे आदी उपस्थित होते. यावेळी शरद हिवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून माजी वसुंधरा अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे तसेच प्रसाद शास्त्री कुलकर्णी व सचिन सोनवणे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मुख्याधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून कापडी पिशवी वाटप करून पर्यावरणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे असे यावेळी संबंधित केले. या कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा अभियंता रूपाली भालेराव स्वच्छता निरीक्षक सागर झावरे प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे शहर समन्वयक गौरव चुंबळे प्रकल्प अधिकारी शितल शेळके कर व-निरीक्षक श्री भोळे श्री आदित्य मुरकुटे श्री पारधी राधेशाम निकम संजय लोणारी शशिकांत मोरे राजेंद्र गंगापूरकर शिवशंकर सदावर्ते संध्या गवळी सुषमा विखे सरस्वती तुंबारे मुंडे मॅडम श्री जांभुळकर किरण अहिरे नितीन हारके नितीन आहेर प्रभाकर वाघ अविनाश वाहुळ अधिक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री सागर झावरे यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोढरे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने शहरातील प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा तसेच त्या झाडाचे संगोपन करावं त्याचा वाढदिवस साजरा करावा व पर्यावरणाची हानी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी
किरण देशमुख
मुख्याधिकारी येवला नगरपरिषद येवला