जागतिक सिकलसेल दिना निमित्त
आदिवासी मुलींचे वसतीगृह येवला येथे सिकलसेल तपासणी शिबीर संपन्न
येवला : पुढारी वृत्तसेवा
संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष व 19 जून जागतिक सिकलसेल दिना निमित्त ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक संचालित आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह येवला जि नाशिक येथे सिकलसेल जनजागृती कार्यक्रम व आरोग्य शिबीर संपन्न झाले सर्व प्रथम जननायक, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून पूजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी भागामध्ये वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी जमातीमध्ये नातेसंबंधात विवाह होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये वंशाने चालत आलेले आजार दिसून येतात .सिकलसेल हा अशा आजारांपैकी एक आहे.या आजाराबाबत जागरूकता नसल्याने.मोठया प्रमाणावर अनिदानीत राहिल्याने व निदान झाले असल्यास उपचार व आजरामुळे भविष्यातील धोके याबत समुपदेशन यांच्या अभावामुळे या आजाराचे गंभीर परिणाम दिसून येतात. या बाबत विद्यार्थी-विध्यार्थीनी मध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने वसतीगृहाच्या वतीने डॉ. सचिन वैद्य ,वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र पाटोदा ,ता येवला यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, अफीया मॅडम,श्री.एम ए कुमावत आरोग्य सेवक ,श्रीमती शेख एस ए, आरोग्य सेविका व आशा श्रीम.भारतीताई वैद्यकीय पथकाच्या कडून सिकलसेल आजराबाबत जनजागृती केली यावेळी सुमारे 40 विध्यार्थीनी टेस्ट सहीत व वसतीगृहाचे कर्मचारी श्रीम. हर्षा रोहम व उपस्थित पालकांनी सुध्दा उस्फुर्त पणे आपली सिकलसेल चाचणी करून घेतली.
यावेळी वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती सुशीला पेढेकर यांनी विध्यार्थीनीना सिकलसेल आजाराबाबत सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी समुदायात जनजागृती करावी असे अवाहन केले सूत्रसंचालन वसतिगृहाचे एच डी मेश्राम सर यांनी केले तर आभार शालिनी भोरे यांनी मानले
****