शिक्षक मतदार संघ निवडणूकिसाठी तीन उमेदवारांकडून सहा नामनिर्देशनपत्रे सादर
शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना 31 मे, 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे.शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी दि. 3 जून, 2024 रोजी 3 उमेदवारांकडून 6 नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली आहेत.
यात राजेंद्र एकनाथराव विखेपाटील, मु. पो. लोणी बु. ता. राहता जि. अहमदनगर यांनी दोन नामनिर्देशन पत्र अपक्ष मधून सादर केली आहेत. निशांत विश्वासराव रंधे, 7 ब-पित्रेश्वर कॉलनी शिरपूर, ता. शिरपूर जिल्हा धुळे यांनी तीन नामनिर्देशन पत्र सादर केली असून दोन अपक्ष व एक भारतीय जनता पार्टी तुन नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. राजेंद्र दौलत निकम ,मु. पो. गुगळवाड ता. मालेगाव जि. नाशिक यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.