बौद्ध पोर्णिमा उत्साहात साजरी
येवला : पुढारी वृत्तसेवा
बौद्ध पोर्णिमा निमित्त शहरातील आंबेडकर नगर येथील बौद्ध बांधवांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते पूजन करून बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पोलीस निरीक्षक विलास पुजारी,अभय ढाकणे,महेंद्र पगारे,महेश आहेर विलास पगारे येवला मर्चंट बँक संचालक सुभाष गांगुर्डे आदी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्प वाहून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आल्या. दरम्यान महेंद्र पगारे यांच्या उपस्थित बौद्ध बांधवांनी सामूहिकरीत्या त्रिशरण पंचशील ग्रहण केले.सुभाष गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ हिरे,सागर पडवळ, कुणाला लाठे, शुभम गायकवाड, सागर हिरे,सोनू ठोंबरे,पपु आवटी, अनिकेत जगताप, आदित्य पगारे, मिलिंद गांगुर्डे, वैभव मोरे,विशाल प्राईस, आदीसंह सर्व समाजबांधव यांनी प्रयत्न केले.
यावेळी येवला शहरासह परिसरातील तब्बल सातशे बौद्ध उपासक आणि उपसिकांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला