अमेरिकेतून येवल्यात मतदानासाठी आला मतदार



अमेरिकेतून येवल्यात मतदानासाठी आला मतदार
 
येवला :  

अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या पारेगाव ता. येवला येथील युवक प्रतीक महाजन याने अमेरिकेतून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
प्रतीक अमेरिकेतील शिकागो या राज्यात  वास्तव्यास असून तो तेथेच एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करीत आहे. वास्तव्य जरी परदेशात असले तरी भारतातील सर्व घडामोडीवर आपण लक्ष ठेवून असतो. त्यामुळे च मी खास मतदान करण्यासाठी, माझ्या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी, देशाची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती देण्यासाठी मी भारतात आलो आहे, असे प्रतीक सांगतो.

प्रतिक्रिया : - 
मतदान करणे हा आपला पवित्र हक्क असून हा अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिला आहे. हा हक्क बाजावण्यासाठीच मी भारतात आलो आहे. लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येकानेच मतदान करणे गरजेचे आहे. आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी लायक उमेद्वारालाच मतदान करावे.
- : प्रतीक महाजन, पारेगाव, ता येवला
थोडे नवीन जरा जुने